नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आधार असलेली नाशिककरांची सुपरिचित ‘डेअरी पॉवर लिमिटेड’ आणि ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ यांनी दुध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारामार्फत नाशिक जिल्ह्यांतील डेअरी पॉवर लिमिटेड च्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक गुरे बाळगण्यास सक्षम करण्यासोबतच जनावरांचे आरोग्य, उत्पन्न आणि दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी भारतीय स्टेट बँक, क्षेत्रीय कार्यालय २ यांच्या लासलगाव शाखेमार्फत मिळणारी क्रेडिट सुविधा मदत करेल.
“एसबीआय आमचा भागीदार म्हणून झाल्याबद्दल आम्हांला आनंद होत आहे आणि या उपक्रमाचे नेतृत्व करणार्या डेअरी उद्योगातील पहिल्या काही व्यक्तींपैकी आम्ही एक असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे डेअरी पॉवर लिमिटेड चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक श्री. दिपक आव्हाड यावेळी बोलतांना म्हणाले.”
तसेच डेअरी पॉवर लिमिटेड ची उत्पादने ठेवणाऱ्या किराणा दुकानदार व जनरल स्टोअर्स विक्रेते यांना देखील शेतकऱ्यांप्रमाणेच अशा प्रकारची क्रेडिट सुविधा देण्यात यावी अशी मागणी दिपक आव्हाड यांनी केली असून, स्टेट बँक ऑफ इंडियाचे (महाराष्ट्र मंडल, मुंबई) महाप्रबंधक यांनी देखील त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
मागील अनेक वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आधार असलेली नाशिककरांची सुपरिचित ‘डेअरी पॉवर लिमिटेड’ ही कंपनी म्हणून कार्यरत आहे.
या वेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्री. राजेश कुमार, महाप्रबंधक (महाराष्ट्र मंडल, मुंबई), श्री. मुकेश कुमार सिंग, उपमहाप्रबंधक, (प्रशासनिक कार्यालय, नाशिक), श्री. सुशील कुमार, सहाय्यक महाप्रबंधक, (नाशिक ग्रामीण विभाग.), श्री. अवनीश शुक्ला, मुख्य प्रबंधक, डॉ. रवींद्र चेचरे, तांत्रिक अधिकारी कृषी, श्री. आशुतोष वर्मा, प्रबंधक, लासलगाव शाखा, आणि डेअरी पॉवर लिमिटेड चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी संचालक श्री. दिपक आव्हाड, व नियंत्रक श्री. राजेश तिवारी आदी उपस्थित होते.
स्वतःचे वितरणाचे जाळे निर्माण करून ६००० दुकानदारांना थेट पुरवठा करण्याचे उद्दिष्ट डेअरी पॉवर ने साध्य केले आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात डेअरी पॉवरचे स्वतःचे तब्बल ३० आउटलेट्स असून थेट ग्राहकाला वाजवी दरात प्रोडक्ट उपलब्ध करून दिले आहे. या कंपनीचे वेगळेपण म्हणजे येथे काम करण्यासाठी केवळ शिक्षण हा एकच निकष नसून त्यासोबतच कर्तुत्व आणि काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती हा सर्वात महत्वाचा निकष देखील दिपक आव्हाड पाहतात. सर्व सामान्य माणसाला रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने एकाच कुटुंबातील सर्व सदस्य एकाच कंपनीत काम करू शकतील अशा प्रकारच्या दिपक आव्हाड यांच्या अनोख्या एच.आर. पॉलीसीला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. डेअरी पॉवर च्या सर्व उत्पादनांना नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी असते.श्री दिपक आव्हाड यांच्या “कमीत कमी १० लिटर दुध घालणाऱ्या एका शेतकरी राजा समोर १० ग्राहक उभे करणे” या व यांसारख्या अनेक अनोख्या विचारसरणी आणि धोरणांमुळे डेअरी पॉवरने यशाचे शिखर गाठले आहे.आणि त्यामुळेच संपूर्ण जिल्ह्याभरात अनेक लोकांच्या पसंतीस देखील उतरले आहे.
सर्व ग्राहकांना नेहमीच आपल्या दर्जेदार वाहतूक यंत्रणेमार्फत कोल्ड चेन मेंटेन ठेवून स्वच्छ आणि चविष्ट उत्पादने डेअरी पॉवर देत आहे आणि विशेष म्हणजे हि सर्व उत्पादने चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरली आहेत. स्वतः चे संकलन, स्वतःचे मॅन्युफॅक्चरींग युनिट, स्वतःची वितरण व्यवस्था, स्वतःचे रिटेल आउटलेट्स, स्वतःची १०० हून अधिक गाड्यांची वाहतूक व्यवस्था एकूणच अशा प्रकारे स्वतःच्या अनोख्या व अद्वितीय धोरणांमुळे B 2 C उत्तम प्रकारे साध्य करण्यात श्री दिपक आव्हाड यांनी अल्पावधीतच मोठे यश संपादन केले आहे. डेअरी पॉवरच्या आजवरच्या यशाचे श्रेय दिपक आव्हाड हे फक्त स्वतःला देत नसून संबंधित सर्व शेतकरी राजा, सर्व ग्राहक, सर्व कर्मचारी वर्ग, सर्व स्टाफ, चालक, वितरक, दुकानदार आणि सर्व नाशिककरांचे आहे. येत्या पुढील काळात डेअरी पॉवरला ६००० दुकानांपासून असलेला व्याप वाढवत १५००० दुकानांपर्यंत यशस्वी रित्या पोहोचायचे आहे, आणि त्या दिशेने डेअरी पॉवर लिमिटेड ची वाटचाल देखील उत्तमरित्या सुरु आहे.