अजय सोनवणे,इंडिया दर्पण वृत्तसेवा
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव शहरात दोन वर्षे कुठलेच धार्मिक सण साजरे होऊ शकले नाही, यंदा मुक्त वातावरणात दही हंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला, मालेगावतील युवा संघटनेच्या १२ बंगला येथील देवाची मानाची दही हंडी जल्लोषात साजरी झाली. शहरातील श्रीराम नगर मधील श्रीराम स्वराज्य मंडळाने पाच थर लावत ही मानाची हंडी फोडत २१ हजार रोख व स्मृतिचिन्ह पटकविण्याचा मान मिळवला. या मानाच्या दही हंडीच्या कार्यक्रमास खासदार सुभाष भामरे उपस्थित होते. मालेगाव युवा संघटनेचे देवा पाटील हे या दहीहंडीचे आयोजन करीत असतात, दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी मोठी गर्दी रात्री उशिरा पर्यंत झाली होती.