अजय सोनवणे, मनमाड
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती राज्यात विविध पद्धतीने साजरी करण्यात आली. मालेगाव तालुक्यात सुद्धा अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी होत असताना खुद्द राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी बुलेट स्वारी करत मतदार संघातील तळवाडे येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. राज्याचे कृषीमंत्री चक्क बुलेट वरून जात हा कार्यक्रम साजरा करत आल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे..