इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागून करण्यात आल्याची घोषणा आज राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. २०२५-२६ या वर्षापासून सीबीएससी पॅटर्न लागून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य अभ्यासक्रम आराखड्याला शाळेय शिक्षण विभागाशी संदर्भात सुकाणू समितीने मान्यता दिली असून मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर देत ही माहिती दिली. भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी विधान परिषदेतील प्रश्नावर लेखी उत्तर विचारला होता. त्यांना उत्तर देतांना दादा भुसे यांनी ही माहिती दिली.
राज्यातील इयत्ता तिसरी ते बारावीच्या शाळांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सीबीएसई अभ्यासक्रमाला सुकाणू समितीने मान्यता दिली का? असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी विचारला होता. त्यावर, सीबीएसई अंतर्गत पाठ्यपुस्तके मराठीत उपलब्ध करुन दिली जाणार असून १ एप्रिलपासून सत्राची सुरुवात करण्यात येणार असल्याचे उत्तर दादा भुसे यांनी दिले.