बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकच्या मातोश्री वसतिगृहात २०० विद्यार्थिंनीची प्रवेशाची क्षमता, १०९ विद्यार्थिनींना प्रवेश…रिक्त जागांवर प्रवेश देण्याच्या पालकमंत्रीच्या सूचना

by India Darpan
सप्टेंबर 25, 2024 | 5:39 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240925 WA0222 1 e1727266163360


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मातोश्री मुलींच्या वसतिगृहात जुलै २०२४ पासून शहरात शिक्षणासाठी आलेल्या मुलींची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या विद्यार्थिंनीना वसतिगृहात आवश्यक सेवा-सुविधा पुरविण्यासाठी निधीची उपलब्धता करून देण्यात येईल, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रो.ह.यो व फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी येथे सांगितले.

मातोश्री मुलींचे वसतिगृह भेट तसेच प्रवेश इत्यादीबाबत आढावा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सारधीचे उपसंचालक सुधीर खांदे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक जी. व्ही. गर्जे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त देविदास नांदगावकर, सारथीचे संशोधन अधिकारी सुनील दंडगव्हाळ, सहाय्यक लेखाधिकारी मनीषा पाटील, महाज्योतीच्या प्रादेशिक समन्वयक सुवर्णा पगार, गृहपाल अजिता शिंदे, कृषी अधिकारी प्रियांका जगताप, प्रकल्प अधिकारी प्रथमेश गायकवाड यांच्यासह मातोश्री वसतिगृहातील विद्यार्थींनी उपस्थित होत्या.

पालकमंत्री भुसे म्हणाले की, नाशिक शहरात ग्रामीण भागातून मुली शिक्षणासाठी येतात. मातोश्री वसतिगृहात २०० विद्यार्थिंनीची प्रवेशाची क्षमता असून 109 विद्यार्थिनी आतापर्यंत प्रवेशित झाल्या आहेत. वसतिगृह प्रवेशासाठी आलेल्या अर्जांवर तत्काळ कार्यवाही करून रिक्त जागांवर प्रवेश देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. भुसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींची सुरक्षा ही महत्वाची बाब असून त्यात कोणतीही हयगय वा कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने वसतिगृहाचा परिसर स्वच्छ ठेवावा.

मुलींना शिक्षणासाठी विविध क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. चांगले अध्ययन करून यशाचे उच्च शिखर गाठावे, आपल्या आई-वडिलांच्या नावासह नाशिकचे नावही उज्ज्वल करा अशा शब्दात पालकमंत्री भुसे यांनी विद्यार्थींनीना शुभेच्छा दिल्या. यावेळी सारथीच कडून प्रवेशित मधुरा खताळे, मयुरी ढोके, महाज्योतीकडून प्रवेशित पल्लवी ढोमसे, कविता माळी व उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून प्रवेशित आरती वाघेरे, श्रद्ध रहाणे या विद्यार्थिंनीना प्रातिनिधीक स्वरूपात पालकमंत्र्यांच्या हस्ते वसतिगृह प्रवेशपत्र देण्यात आले.

यांनतर मातोश्री वसतिगृहातील अधिकाऱ्यांसमवेत पालकमंत्री भुसे यांनी बैठक घेतली. या बैठकीत वसतिगृहातील प्रवेश,आवश्यक सुविधा व अडचणी याबाबत चर्चा झाली. वसतिगृहात विद्यार्थिंनींना आवश्यक असलेले जीम साहित्य, ग्रीन जीम, क्रीडांगण, संगणक संच, स्पर्धा परीक्षांची पुस्तके, दूरदर्शन संच आदी सेवा उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत पालकमंत्री भुसे यांनी आश्वासित केले. तसेच मुलींना चांगल्या प्रतीची भोजनाची व्यवस्था ठेवावी त्यासोबतच वसतिगृहातील नियमांची अमंलबजावणीबाबत सूचनाही दिल्या. वसतिगृहातील कार्यालय, गृहपाल निवास, ग्रंथालय, भोजन कक्ष, करमणूक कक्ष, संगणक कक्ष यांची पाहणी पालकमंत्री भुसे यांनी केली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आर्थिक व्यवहारातून २७ वर्षीय तरूणाची आत्महत्या…मृताच्या पत्नीसह दहा नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

नाशिकच्या दौ-यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्याला महामार्गाच्या खड्ड्यांमुळे ब्रेक!….

India Darpan

Next Post
IMG 20240925 WA0245 2

नाशिकच्या दौ-यात केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताफ्याला महामार्गाच्या खड्ड्यांमुळे ब्रेक!….

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011