नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –शहरात घडलेल्या घटनेनंतर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने तसेच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी दूरध्वनी वरून संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला असून आज (दि.१७ ऑगस्ट) रोजी दुपारी १.३० वाजता प्रशासनासोबत तातडीची बैठक नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बोलवली आहे.
मंत्री भुसे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले असून कुणीही कायदा सुव्यवस्था बिघडेल असे वर्तन करू नये, कायदा हातात घेऊन सलोखा बिघडेल असे वर्तन टाळावे, प्रशासनाला सहकार्य करून शहराची शांतता भंग होणार नाही यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. समाज माध्यमांवर कुणीही अफवा पसरवू नये नागरिकांनी देखील अफवांवर विश्वास ठेवू नये संशयास्पद काही आढळून आल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन देखील यावेळी केले.
मंत्री भुसे यांनी अपोलो हॉस्पिटलच्या प्रशासनाशी संवाद साधला असून जखमींची विचारपूस केले आहे. यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलीस प्रशासन तसेच इतर यंत्रणा जनतेच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहेत. मात्र या यंत्रणेला नागरिकांनी देखील सहकार्य करून नाशिक शहराचे महात्म्य जपण्याचे आवाहन मंत्री भुसे यांनी केले आहे.