नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनाचे जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण गुरूवार, १४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९.०५ वाजता विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक च्या प्रांगणात सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.
मुख्य शासकीय समारंभात निमंत्रित मान्यवरांना सहभागी होता यावे यासाठी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३५ ते ९.३५ या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी ८.३५ च्या पूर्वी किंवा ९.३५ वाजल्यानंतर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
कार्यक्रमास राष्ट्रीय पोशाख/गणवेशात उपस्थित राहावे. ध्वजारोहणाचा समारंभ सुरु होण्यापूर्वी २० मिनिटे अगोदर आसनस्थ व्हावे व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही बॅग सोबत आणू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.