सुयश सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
आज लाडक्या बाप्पाचे सर्वत्र आगमन झाले आहे,गणरायाच्या या उत्सवासाठी सेलिब्रेटी,राजकीय नेते मागे नसतात राज्याचे बंदरे व खनिजकर्मी मंत्री दादा भुसे यांनी मालेगाव मधील आपल्या घरी श्री गणेशाची स्थापना केली. संपूर्ण कुटुंब यावेळी उपस्थित होते, २ वर्षे कोरोनामुळे सार्वजनिक गणेश उत्सव साजरे होऊ शकले नाही. मात्र यंदा सर्वत्र जल्लोषात गणेश उत्सव साजरा होत आहे. गोरगरीब,कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळू दे, महाराष्ट्राची प्रगती होऊ दे अशी प्रार्थना यावेळी गणेशकडे भुसे यांनी केली.