नाशिक – वाढत्या उष्णतेचा पिकांना मोठा फटका बसत आहे. डाळींब पिक धोक्यात आले आहे. मात्र डाळींबाचे आगार समजल्या जाणाऱ्या मालेगाव दाभाडी येथील डाळींब उत्पादक सुरेश निकम यांनी नामी शक्कल लढवित चक्क डाळींब पिकांना साड्यांचे अच्छादन केले. स्थानिक बाजारपेठेतून त्यांनी १५ ते २० रुपयांना जुन्या साडया विकत घेतल्या एक एकरातील ३०० झाडांना त्यांनी साड्यांचे अच्छादन केले.त्यासाठी त्यांना अवघा ५ हजार रुपये खर्च आला. कमी खर्चात त्यांच्या डाळींब बागाचे उन्हापासून संरक्षण होणार आहे. निकम यांच्या या “आयडियाच्या कल्पने”ची सर्वत्र चर्चा होत आहे.