बुधवार, नोव्हेंबर 26, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

सायरस मिस्त्री कार अपघातः घटनास्थळी पोहचले विशेष पथक, या देशात पाठवणार सर्व माहिती, कळणार अचूक कारण

सप्टेंबर 7, 2022 | 4:06 pm
in संमिश्र वार्ता
0
Fb1Ki0naQAA3GcL e1662357477977

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातातील मृत्यूनंतर जगभरात त्याची चर्चा होत आहे. या अपघाताची मर्सिडीज कंपनीनेही गंभीर दखल घेतली आहे. हा अपघात का आणि कसा झाला, याचा शोध घेण्यासाठी कंपनीचे विशेष पथक थेट जर्मनीहून भारतात दाखल झाले आहे. या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.  त्यानंतर अपघातग्रस्त कारची पाहणी केली आहे. हे विशेष पथक या संदर्भात लवकरच एक अहवाल तयार करणार आहे.

अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला, याचा शोध विविध पातळ्यांवर घेतला जातोय. काही महत्त्वाच्या तपास संस्थांमार्फत चाचपण्या सुरु आहेत. अपघातावेळी सायरस मिस्त्री मर्सिडीज कारमध्ये होते. नेमकी कुणाची चूक आहे, कारमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला की अन्य काही, याचा शोध सध्या घेतला जात आहे. भरधाव वेगातील ही कार दुभाजकावर जोरदार आदळली. डॉ. अनाहिता पंडोले (वय ५५ वर्षे) या कार चालवत होत्या. त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या बाजूला म्हणजेच समोरील सीटवर पती डेरियस पंडोले होते. पतीचे भाऊ जहांगीर दिनशा पंडोले आणि सायरस मिस्त्री मागील सीटवर बसले होते. अनाहिता आणि त्यांचे पती बचावले. गंभीर जखमी झाले तर सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. या दोघांनी सीटबेल्ट लावला नव्हता, असे म्हटले जात आहे.

अपघातातील कार ही मर्सिडीज बेंझ आहे. ती जर्मनीतली लक्झरी कार कंपनी आहे. कंपनीने या अपघाताची गंभीर दखल घेत विशेष पथक भारतात पाठविले आहे. घटनास्थळावरून गाडीचा पूर्ण डेटा कलेक्ट करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा डेटा आधी पुणे आणि नंतर जर्मनीला पाठवला जाईल. आता पुढील तपासासाठी हा डेटा जर्मनीत डी कोड केला जाईल. त्यातून तांत्रिक माहिती उघड होईल. गाडीचे कोणते पॅरामीटर सुरु होते, कोणते बंद होते, हेही कळेल. या कारमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का, स्टेअरिंग लॉक, चाकांमध्ये बिघाड, आतील एअरबॅग का उघडली नाही, आदी सर्व शंकांचे निरसन या डेटाद्वारे केले जाईल.

जर्मनीतील मर्सिडीजच्या प्लांटमध्ये डेटा डीकोड करण्याची सुविधा आहे. राज्य वाहतूक शाखेचे पोलीस मुंबई अहमदाबाद हायवेवर साइनेज, स्पीड लिमिट बोर्ड आणि स्पीड अलर्ट आहेत का, याचा तपास करेल. सूर्या नदीच्या पूलावर जिथे अपघात झाला, तिथे दिशादर्शक नसल्यामुळे थ्रीलेन ऐवजी टू लेन बनवण्यात आल्याचे सांगण्यात येते आहे. यासह ब्लॅक स्पॉटही शोधले जातील. राज्य वाहतूक दलाचे अतिरिक्त संचालक के. के. सारंगल म्हणाले, अपघात झाला, तिथे उजवीकडे वळण आहे. त्यामुळे तिथे वेगासंबंधी दिशा निर्देश गरजेचे होते. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणाचा अहवाल राष्ट्रीय महामार्ग वाहतूक प्राधिकरणाला पाठवला जाईल.

Cyrus Mistri Car Accident Special Team Investigation

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक! ब्रेसलेट व सोनसाखळीसाठी विवाहितेशी अनैसर्गिक संबंध ठेऊन अत्याचार

Next Post

मखमलाबाद लिंकरोडवर स्कुटीस्वाराचा मृत्यू तर आडगावला विहीरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
crime 6

मखमलाबाद लिंकरोडवर स्कुटीस्वाराचा मृत्यू तर आडगावला विहीरीत उडी घेत तरुणाची आत्महत्या

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011