मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – घरगुती एलपीजी सिलेंडर व व्यावसायिक सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसात या सिलेंडरमध्ये सतत वाढ होत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी ही वाढ झाली आहे. १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. तर, १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत ३५०.५० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता १९ किलोचा व्यावसायिक सिलेंडर २११९.५० रुपयांना मिळणार आहे. तर घरगुती एलपीजी सिलिंडर ११०३ रुपयांवर मिळणार आहे
देशातील दिल्लीबरोबर देशातील चार महानगरात सिलेंडरचे दर हे असणार आहे. मुंबईत एलपीजीची दर ११०२.५० रुपये प्रति सिलेंडरवर तर व्यावसायिक सिलेंडरचे दर २०७१.५० रुपये आता असणार आहे. तर कोलकातामध्ये एलपीजीची दर ११२९ रुपये असणार असून व्यावसायिक सिलेंडरचे दर २२२१.५० रुपये असणार आहे.
चेन्नईमध्ये एलपीजीची किंमत १११८.५० रुपये तर व्यावसायिका सिलेंडरचे दर २२६८ रुपये असणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1630740174836744196?s=20