विशेष प्रतिनिधी, मुंबई
दक्षिण अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येत्या १५ मे च्या आसपास येण्याची शक्यता आहे. तशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हे चक्रीवादळ दक्षिण अरबी समुद्रात आल्यानंर त्याचा प्रवास उत्तर पश्चिम दिशेने सरकण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे १४ मे रात्री पासून केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा किनारपट्टीच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना व बोटिंना परतण्याचे इशारे देण्यात आले आहेत. तसेच, या चक्रीवादळाचा परिणाम पुढील आठवड्यात महाराष्ट्राच्या हवामानावरही होणार आहे. चक्रीवादळाची दिशा आणि वेग यावर ते अवलंबून असणार आहे.
द.अरबी समुद्रात १५ मे च्या आसपास चक्रीवादळाची शक्यता. उ.उ पच्छिम सरकण्याची शक्यता.
१४ मे रात्री पासुन केरळ, लक्षद्वीप, कर्नाटक, महाराष्ट्र-गोवा किनार पट्टी च्या भागांना सतर्कतेचा इशारा. मच्छिमारांना व बोटींना परतण्यासाठी इशारे
– IMD @CMOMaharashtra
@DisasterState— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 11, 2021