-
कोकण किनारपट्टी भागात प्रचंड प्रमाणात नुकसान
-
तुफान पाऊस घरांसह झाडांचीही पडझड ; विज पुरवठा खंडीत….
मुंबई – गेल्या दोन ते तीन अरबी समुद्रात आलेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकुळ घातला आहे. गोव्यामध्ये नुकसानीचे तांडव करीत मुंबई कोकणातील सर्व जिल्ह्यामध्ये हाहाकार माजविला आहे. कोकण किनारपट्टीला समांतर वाटचाल करत असलेल्या या चक्रीवादळाने आता मुंबईच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली आहे. त्यामुळे कोकणात तसेच पुणे, नाशिकसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून चक्रीवादळ, जोरदार वारा, विजेचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह अनेक ठिकाणी याचा मोठा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी घरांची आणि अनेक झाडांची पडझडही झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने आणि तारा तुटल्याने गेल्या २४ ते ४८ तासांपासून विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. दरम्यान रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरांची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. मच्छीमाराच्या शेकडो बोटी किनाऱ्यावरच उभ्या आहेत. दरम्यान, संपूर्ण कोकणात जिल्ह्यांमध्ये दोन दिवस लसीकरण मोहीम बंद ठेवण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
मुंबई परिसर : सध्या तौत्के चक्रीवादळ हे मुंबईपासून सुमारे १५० ते १६० किमी अंतरावर असून अद्याप तरी तौत्के चक्रीवादळाचा मुंबईला धोका नाही, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. मात्र हे चक्रीवादळ मुंबईनजीकच्या समुद्रातून गुजरात कडे जाणार असल्याने सध्या त्याचा प्रभाव सर्वत्र दिसत मिळत आहे. मुंबईत सध्या वेगवान वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. मुंबई मधील दादर, वरळी, लोअर परेल, माटुंगा, माहिमसह पश्चिम उपनगरात सर्वत्र जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबईतील वरळी सी फेस, शिवाजी पार्क, मरीन ड्राईव्ह या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर उंचच उंच लाटा उसळत आहेत. येत्या काही तासांत मुंबईतील पाऊस आणि वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पालघरसह इतर आजूबाजूच्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत आतापर्यंत ३४ ठिकाणी झाड पडण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी नाही.
ठाणे आणि नवी मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राला या तौत्के चक्रीवादळाचा फटका बसला आहे. रविवारी रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर आता आणखी वाढला आहे. मुंबईपाठोपाठ ठाणे, नवी मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे ठाणे, नवी मुंबईसह इतर ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हे : रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या राजापूर, सिंधुदुर्ग, आंबोळगड यांसह इतर गावांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. रत्नागिरीतील १०४ गावांमधील ८०० ते १ हजार घरांची पडझड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच रत्नागिरीसह सिंधुदुर्गातील बहुतांश गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे. रत्नागिरी, राजापुर, देवगड, मालवण, वेगुर्ले या भागातील बत्ती गुल झाली आहे. काही ठिकाणी रविवारी दुपारपासूनच वीज पुरवठा खंडित झाला आहे. तौत्के चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किनारपट्टीवरून आतापर्यंत ६ हजार ५४० नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. सोमवारी पहाटे रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. चक्रीवादळ रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीवर गोंगावत असून माणगाव, पेण, महाड, पोलादपूर आदि तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. आता हे चक्रीवादळ मुंबईच्या दिशेने सरकत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले
पुणे, कोल्हापूर : चक्रीवादळाच्या परिणामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यातही सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. पुण्यात वादळी वारा आणि पावसामुळे झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. तर, कोल्हापूर, सांगली या परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. महाबळेश्वर पाचगणी, वाई या भागात एकीकडे जोरदार वारा, पाऊस आणि दुसरीकडे थंडीमुळे थंडीने हा परिसर गारठून गेला .
नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार :या चक्रीवादळाचा परिणाम नाशिकमध्येही जाणवत आहे. नाशिकमध्ये सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. शहरातील काही भागात पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्या. शहरात वारा मात्र कमी आहे. त्यामुळे झाडे किंवा अन्य पडझडीच्या घटना दिसून आल्या नाहीत. दरम्यान, नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.त्याचप्रमाणे खानदेशातील जळगाव, धुळे नंदुरबार या जिल्ह्यातही जोरदार काही ठिकाणी जोरदार ठिकाणी जोरदार ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला तसेच वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात वादळामुळे झोपडीवर झाड कोसळून दोन बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यात अंमळनेर तालुक्यातील अंचलवाडी गावात घडली. तर धुळे परिसरात पिकांचे मोठे नुकसान झाले. नंदुरबारमध्ये वाळत घातलेल्या लाल मिरची पथारीचे मोठे नुकसान झाले.
विदर्भ = अकोला, वाशीम, अमरावती :विदर्भातील अनेक जिल्ह्यात तौत्के चक्रीवादळाचा परिणाम झाला अकोला जिल्हातही जिल्ह्यातील वाडेगाव येथे जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्याला पावसामुळे वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील वार्डात पाणी घुसले, त्यामुळे रुग्ण आणि नातेवाईक मोठी तारांबळ उडाली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील स्वच्छतागृह आणि रिकाम्या परिसरातून पावसाचे पाणी शिरले. अमरावती, बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या.
मराठवाडा – औरंगाबाद, जालना, परभणी : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे मोठे नुकसान झाले विशेषत : औरंगाबाद, जालना, परभणी जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. परभणी जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून वादळी वारे वाहत आहे. रविवारी सांयकाळी आणि सोमवारी पहाटे ढगांच्या गडगडाटासह अनेक भागात पावसाने हजेरी लावली.औरंगाबादमध्ये रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. आणि दुपारी पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा जाणवला, त्यामुळे मे मधील उकाड्यापासून काही काळ नागरिकांची सुटका झाली. दरम्यान, जालन्यात पावसामुळे शेती पिके आणि फळबागांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कोरोना लसीकरणाला लागला ब्रेक : राज्यात एकीकडे कोरोनाचा हाहाकार असताना दुसरीकडे चक्रीवादळामुळे कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण किनारपट्टीलगतच्या बहुतांश जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आली आहे. पुढील दोन दिवस ही लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता रुग्णालय, ऑक्सिजन, व्हेंटिलरसह, आयसीयूची सोय करण्यात आली आहे.
प्रशासनाकडून खबरदारी, उपाययोजना :कोकणात तौत्के चक्रीवादळामुळे अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान झाल्याचे दिसत आहे. मात्र जीवितहानी टाळण्यासाठी प्रशासनाने मोठी खबरदारी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ, आपत्ती व्यवस्थापनाची पथके रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडच्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आली आहेत. तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, चक्रीवादळच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. समुद्र किनारी जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.