विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
अरबी समुद्रात आलेल्या तोक्ते या चक्रीवादळाने सध्या दहशत निर्माण केली आहे. याच निमित्ताने चक्रीवादळ आणि त्यांच्या नामकरणाशी संबंधित माहिती जाणून घेणार आहोत.
तोक्ते नाव कुणी ठेवले
‘तोक्ते’ हे नाव म्यानमारने ठेवले आहे. तोक्ते हा बर्मी शब्द आहे, ज्याचा अर्थ ‘खूप गोंगाट’ असा होतो.
हे देश करतात नामकरण
या चक्रीवादळांना जागतिक हवामान विभाग, युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अँड सोशल कमिशन फॉर एशिया एंड पॅसिफिक (डब्ल्यूएमओ – ईएससीएपी) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (पीटीसी) यांनी हे चक्रीवादळांना नाव देत असतात. या पॅनेलवर एकूण १३ देश आहेत. यामध्ये भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, पाकिस्तान, ओमान, श्रीलंका, थायलंड, इराण, कतार, सौदी अरेबिया, युएई आणि येमेन यांचा समावेश आहे.
अशी असते प्रक्रीया
पॅनलवरील एकूण १३ देश हे चक्रीवादळाची नावे ठेवण्याचे सूचित करतात. मागील वर्षी प्रत्येक देशाने १३ नावे सूचविली. यामुळे आता चक्रीवादळांच्या नावांमध्ये एकूण १६९ नावांची यादी तयार झाली आहे. यापूर्वी २००४ मध्ये या गटात समाविष्ट असलेल्या ८ देशांद्वारे ६४ नावांची यादी निश्चित केली गेली होती. मग प्रत्येक देशातून आठ नावे आली. गेल्या वर्षी मे महिन्यात भारतात दाखल झालेल्या चक्रीवादळ ‘अम्फान’ त्या यादीतील एक नाव होते. त्याच वेळी, या यादीतील अरबी समुद्रापासून आलेले ‘निसर्ग’ हे या चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले आहे. त्याचे नाव ही बांगलादेशने ठेवले होते. प्रत्येक वेळी नावासाठी भिन्न देशाचा नंबर येतो.
नाव का ठेवले जाते
चक्रीवादळ नाव ठेवण्याचा फायदा असा की, भू आणि सागर वैज्ञानिक, हवामान तज्ज्ञ, आपत्ती व्यवस्थापन टीम आणि सर्व सामान्य लोकांना चक्रीवादळ ओळखण्यास आणि समजण्यास मदत होते. एखाद्या क्षेत्रात दोन वादळ एकत्र येत असल्यास, यामुळे गोंधळ उडत नाही. तसेच आपत्ती इशारा देणे आणि भविष्यात आणि मागील चक्रीवादळांचा उल्लेख करणे हे नाव देण्यामुळे सोपे होते. काही चक्रीवादळांना साधी आणि लहान अशी नावे दिली गेली आहेत. त्यांचा अर्थ सांस्कृतिकदृष्ट्या संवेदनशील होणार नाही किंवा त्यांचा दाहक अर्थ होणार नाही याची काळजी घेतली जाते.