पणजी (गोवा) – अरबी समुद्रात आलेल्या तोक्ते या चक्रीवादळामुळे किनारपट्टीलगतच्या राज्यात हायअलर्ट यापूर्वीच देण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्यालगतच्या हवामानावर लक्षणीय परिणाम झाला आहे. वेगवान वारे सध्या वाहत असून मुसळधार पाऊसही पडत आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील शहरांमध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान सध्या होत आहे. राजधानी पणजीतही अनेक झाडे आणि विजेचे खांब कोसळले आहेत. त्याशिवाय घरे आणि इमारतींचेही मोठे मुकसान झाले आहे. अद्याप जिवीतहानीचे वृत्त नाही. चक्रीवादळाची भीषणता दर्शविणारे हे फोटो