इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय शक्तीशाली चक्रीवादळ बिपरजॉय काल रात्री गुजरातच्या किनाऱ्यावर धडकले. या चक्रीदावळामुळे गुजरातच्या किनारपट्टीवर प्रचंड नुकसान झाले आहे. २२ जण जखमी झाले आहेत. २२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर, शेकडो गावे काळोखात आहेत. आता या चक्रीवादळाने राजस्थानकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सायंकाळी हे चक्रीवादळ राजस्थानमध्ये धडकणार आहे.
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय सकाळी 2.30 वाजता नलियापासून 30 किमी उत्तरेस असलेल्या सौराष्ट्र-कच्छ प्रदेशावर केंद्रित झाले. आज ते उत्तर-पूर्वेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, वादळाची थोडी मंद गती असू शकते. मात्र, सायंकाळपर्यंत ते राजस्थानच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव कच्छमध्ये दिसून येत आहे. शहरात जोरदार वारे वाहत आहेत. चक्रीवादळाच्या तडाख्याने झाडे उन्मळून पडली. बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव द्वारकेतही दिसून येत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सांगितले की, भूभागावर आल्यानंतर अत्यंत धोकादायक चक्रीवादळ बिपरजॉय आता धोकादायक राहिले आहे. महापात्रा म्हणाले की, चक्रीवादळ आता समुद्रातून जमिनीवर सरकले आहे आणि ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने केंद्रित आहे. चक्रीवादळाची तीव्रता 105-115 किमी प्रतितास इतकी कमी झाली आहे.
आयएमडीचे संचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, बिपरजॉय चक्रीवादळ ईशान्येकडे सरकले आहे. नुकतेच गुजरातच्या जाखाऊ बंदराजवळ पाकिस्तानच्या किनाऱ्याला लागून असलेले सौराष्ट्र-कच्छ पार केले. चक्रीवादळ आता समुद्रातून जमिनीकडे सरकले आहे आणि ते सौराष्ट्र-कच्छच्या दिशेने केंद्रीत झाले आहे. चक्रीवादळाची तीव्रता अतिशय तीव्र चक्री वादळात बदलली आहे. चक्रीवादळ 16 जून रोजी म्हणजेच आज संध्याकाळी आपला मार्ग बदलेल.
गुजरातचे आयुक्त आलोक पांडे यांनी सांगितले की, वादळामुळे जवळपास 22 लोक जखमी झाले आहेत. आतापर्यंत कोणाच्याही मृत्यूची बातमी नाही. 23 जनावरांचा मृत्यू झाला आहे, 524 झाडे उन्मळून पडली आहेत आणि काही ठिकाणी विजेचे खांबही पडले आहेत, त्यामुळे 940 गावे वीजविना आहेत.
अरबी समुद्रात १० दिवस धुमाकूळ घातल्यानंतर ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील जखाऊ बंदरावर धडकले. चक्रीवादळामुळे कच्छ आणि सौराष्ट्र किनारपट्टीवर जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. भावनगरमध्ये मुसळधार पावसात ओव्हरफ्लो नाल्यात अडकलेल्या शेळ्यांना वाचवताना एक माणूस आणि त्याच्या मुलाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 22 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी हे धोकादायक चक्रीवादळ आणखी एका राज्यात आपला कहर दाखवण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.