नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलीकडच्या काळात सायबर क्राईमचे प्रकार वाढू लागले आहेत त्यातच फेसबुक अकाऊंटवरील महिलांचे फोटो डाऊनलोड करण्याचा गैरप्रकार काही जण करतात. एका ट्रक ड्रायव्हरला असाच वाईट नाद होता. या आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमधून अशा ४८५ व्हिडीओ क्लीप जप्त करण्यात आल्या आहेत. यासह मेसेंजरवर ६० महिलांशी तर व्हॉट्सअपवर २५ महिलांशी चॅटही मिळाले आहेत.
गणेश (वय ४२ ) नावाचा हा ट्रक चालक महिलांच्या मूळ छायाचित्रांशी छेडछाड करून आणि इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देऊन अनेक महिलांना ब्लॅकमेल करत असे. या ट्रक चालकाला पोलिसांनी सोमवारी अटक केली. आरोपी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून महिलांना ब्लॅकमेल करायचा. या आरोपीच्या फेसबुक मेसेंजरवर ६० आणि व्हॉट्सअॅपवर २५ महिलांशी अश्लील चॅटिंग आढळून आली.
पोलिसांनी सांगितले की, अटक आरोपीचे नाव गणेश आहे. आरोपीचे वय सुमारे ४२ वर्षे असून तो ट्रक चालक आहे. महिला पोलीस ठाण्यात एनआयटीमध्ये आयटी कायद्याच्या कलमांतर्गत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये पीडित महिलेने सांगितले की, ५ महिन्यापूर्वी तिला व्हॉट्सअॅपवर तिचा अश्लील फोटो असलेला मेसेज आला होता, ज्यामध्ये तिचे चेहरा अश्लील चित्र म्हणून दुसऱ्या चित्राशी जोडला होता. त्यानंतर आरोपीने तिला धमकी दिली की जर तिचा नंबर ब्लॉक केला तर तिचे फोटो इंटरनेटवर पसरवले जातील. महिला खूप घाबरली आणि तिने हा प्रकार आपल्या पतीला सांगितला.
महिलेच्या पतीने त्या नंबरवर फोन केला असता तो नंबर बंद असल्याचे आढळून आले. यानंतर महिलेने पतीसह पोलिसांत तक्रार केली. यानंतर आरोपीविरुद्ध आयटी कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू करण्यात आला. तेव्हा कळाले की तो आरोपी केवळ हे फोटो डाऊनलोड करीत नसे, तर त्या फोटोंशी छेडछाडही करीत असे. हे आपत्तीजनक फोटो नंतर तो त्या महिलांना फेसबुक मेसेंजरवर पाठवीत असे. त्यानंतर या फोटोंच्या आधारे तो त्यांना ब्लॅकमेल करीत असे. ज्या महिला या त्याच्या मेसेजला घाबरत असत, त्यांना फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तो त्यांचा मोबाईल नंबर मागून घेत असे.
इतकेच नव्हे तर तो सातत्याने फोसबुकवर महिलांचे प्रोफाईल फोटो चेक करीत असे. त्यानंतर न्यूड फोटोत तो एडिट करुन अश्लील फोटो तयार करीत असे. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी १६ जिल्ह्यांत छापेमारी केली होती. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी नागौर, अजमेर, जयपूर, किशनगड, रुपनगड, दौसा, अलवर, भरतपूर यासह अनेक ठिकाणी छापे टाकले, परंतु आरोपी प्रत्येक वेळी पळून जात होते. तब्बल ४ महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी आरोपीला अलीगड येथून अटक केली. या आरोपीमुळे पीडित असलेल्या महिलांशी जेव्हा पोलिसांनी संपर्क केला तेव्हा त्या त्रस्त झाल्या होत्या. त्यातील अनेक महिलांना तर प्राण द्यावे असे वाटत असे. बदनामी होण्याच्या भीतीने त्या पोलिसांकडे तक्रारही करीत नसत.
पोलीसांना मोबाईलमध्ये सापडलेले व्हिडीओ इंटरनेटवरुन किंवा ब्लॅकमेल करुन मागवलेले होते. हे सीम कार्ड राजस्थानच्या एका ढाब्याजवळ सापडल्याचे सांगत आरोपी सुटण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आता पोलिसांनी त्याला आता रिमांडमध्ये घेतले आहे. त्याच्या मोबाईलमध्ये ६० महिलांशी त्याने वाईट आणि अश्लील भाषेत फेसबुक मेसेंजरवर चॅटिंग केल्याचे समोर आले आहे. त्याच्या व्हॉट्सअपवर २५ महिलांना केलेले मेसेज सापडले आहेत. हे सगळे तो पैसे मिळवण्यासाठी नव्हे ते मजा किंवा टाईमपास म्हणून करीत असे, असेही त्याने सांगितले आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
Cyber Crime Video Clip Blackmail Women Molestation
Police