नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एखाद्या खासगी संस्थेत काम करत असताना तरुणी किंवा महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. विशेषतः जनसंपर्क विभागात काम करणाऱ्या महिलांनी पुरूषांसोबत संपर्क आल्यास अनेक बरे वाईट अनुभव येतात. त्यातून काही वेळा लैंगिक छळाच्या घटना देखील घडतात, त्यामुळे अशा व्यक्ती पासून सावध राहणे गरजेचे असते. त्यातच अलिकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील महिलांचा शारीरिक व मानसिक छळ करण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत, अशाच प्रकारची घटना नवी दिल्लीत घडली आे.
दक्षिण दिल्ली जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेत काम करणाऱ्या एका तरूणीने गुंतवणूक करण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिक तथा एअर इंडियाचे निवृत्त अभियंता पी.सी. डोगरा ( वय ६४ ) अनेक योजना सांगितल्या होत्या. या संभाषणादरम्यान त्याने बँकेत गुंतवणूक करतो, असे सांगून तरुणीचा मोबाईल क्रमांक घेतला. काही दिवस साधे मेसेज केल्यानंतर या वृद्धाने तरुणीला अश्लील मेसेज आणि व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली.
याबाबत तरुणीने दक्षिण जिल्ह्यातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली. गुन्हा नोंदवल्यानंतर या पथकाने शुक्रवारी आरोपी पीसी डोगरा याला मालवीय नगर येथून अटक केली. त्याने बनावट फेसबुक अकाऊंटवरून पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ बनवले आहे. विशेष म्हणजे हा एअर इंडियाचा निवृत्त अभियंता तरुणीला वारंवार अश्लील व्हिडिओ आणि फोटो पाठवत होता. याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयाने विचारणा केल्यावर त्याने मोबाईलचा पासवर्ड सांगितला. तेव्हा आरोपीच्या मोबाईलमधून अनेक अश्लील व्हिडिओ सापडले आहेत. त्यामुळे दक्षिण दिल्ली जिल्ह्यातील सायबर पोलिसांनी आरोपी वृद्ध अभियंत्याला अटक केली आहे.
cyber crime retired engineer sent porn video to young girl South Delhi arrest