नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तुम्ही जर डेबिट-क्रेडिट आणि UPI द्वारे पैसे देत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, केंद्रीय गृह मंत्रालयाने एक व्हिडिओ शेअर करुन एका मोठ्या फसवणुकीची माहिती सर्वांना दिली आहे. ऑनलाईन व्यवहार करताना खबरदार राहणे किती आवश्यक आहे हे यातून सूचित करण्यात आले आहे.
मंत्रालयाने शेअर केलेला व्हिडिओ दिल्लीतील वसंत कुंज येथील डीएलएफ मॉलमधील आदिदास स्टोअरचा असल्याचे सांगण्यात आले आहे. या व्हिडिओ मध्ये, व्यवहारासाठी वापरल्या जाणार्या पीओएस मशीनच्या वर कॅमेरा दिसत आहे. लोकांनी आपला पिन सुरक्षित ठेवावा आणि तो लपवूनच वापरावा, असा इशारा गृह मंत्रालयाने दिला आहे.
गृह मंत्रालयाने जारी केलेल्या व्हिडिओवरून हे स्पष्ट झाले आहे की, कॅमेरा POS मशीनच्या अगदी वर ठेवला आहे ज्यामध्ये ग्राहक खरेदी केल्यानंतर त्याचा पिन टाकणार आहे. अशा स्थितीत ग्राहकाची आर्थिक माहितीही चोरीला जाण्याचा धोका असतो. मंत्रालयाने आपल्या ट्विटमध्ये लिहिले- “तुमचे पैसे वाचवण्यासाठी तुमचा पिन सुरक्षित करा. पीओएस किंवा एटीएम मशीनमध्ये पिन किंवा ओटीपी टाकण्यापूर्वी, आजूबाजूचे कॅमेरे पहा. दिल्लीतील डीएलएफ मॉल, वसंत कुंज येथे अदिदास स्टोअरमध्ये बिलिंग मशीनच्या अगदी वर माझ्याकडे कॅमेरा होता. त्यामुळे स्पाय कॅमेऱ्यांपासून सावध रहा.”
https://twitter.com/Cyberdost/status/1645692275383758850?s=20
Cyber Crime Fraud Cheating Camera POS Machine