पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या संपूर्ण जग जणू काही सोशल मीडियामध्ये झाले असून आताच्या तरुण पिढी तर त्याच्या अत्यंत आहारी गेली आहे, असे दिसून येते त्यातून सायबर क्राईम सारख्या घटना देखील घडत असतात. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आदिंवर आपले मेसेज फोटो टाकण्याची जणू काही स्पर्धा सुरू झाली असते. त्यातच सध्या सायबर क्राईम चे प्रकार देखील घडत आहे राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरांमध्ये गैरप्रकार अधिकच वाढलेली दिसून येतात पुणे येथे देखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे
मागील महिन्यात नवी दिल्ली येथे एका अल्पवयीन तरुणीने इंस्टाग्रामवर माझे फॉलोअर्स जास्त आहेत, असा वाद घालत रागाच्या भरात आपल्या एका अल्पवयीन मित्राचा चक्क खून केला. तर दुसऱ्या एका घटनेत राजस्थानमध्ये फ्री फायर हा ऑनलाइन गेम खेळत असताना एका १४ वर्षीय मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या पीडित मुलीने आरोपीवर विश्वास ठेवून त्याला तिचा काही आक्षेपार्ह व्हिडिओ पाठवला. त्याआधारे आरोपी तिच्याकडून लैंगिक शोषण करून पाच हजार रुपयांची मागणी करत होता. अशाच प्रकारची घटना पुण्यात घडली, इंस्टाग्रामवरील ओळख २१ वर्षीय तरुणीला चांगलीच महागात पडली आहे. या तरुणीचे अश्लील फोटो प्रियकराने सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा भयानक गैरप्रकार समोर आला आहे. या प्रकरणी प्रियकरावर संजय उर्फ ज्ञानेश्वर बाळू सीतापे ( वय २१ ) असे या तरुणाचे नाव असून त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पुण्यातील सदर तरुणीने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली आहे. फिर्यादी आणि आरोपी हे दोघेही खासगी कंपनीत नोकरी करतात. मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यान या दोघांची इंस्टाग्रामवर ओळख झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर आरोपीने त्या तरुणीचे काही अश्लील फोटो मोबाईलमध्ये काढले होते. काही दिवसांनी या दोघांचे भांडण झाले आणि त्यानंतर तरुणीने आरोपीला भेटण्यासाठी नकार दिला. तरीही आरोपी मात्र तिला भेटण्यासाठी बळजबरी करत होता. इतकेच नव्हे तर तू भेटली नाही तर तुझे नग्न फोटो व्हायरल करील, अशी धमकी देऊ लागला. तरीही तरुणी ऐकत नव्हती, त्यामुळे रागाच्या भरात आरोपीने हे नग्न फोटो थेट तिच्या काकाच्या व्हॉट्सअपवर पाठवले. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसांत धाव घेतली आणि पोलीसात तक्रार दाखल केली. त्यानुसार तरुणावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
काही दिवसांपूर्वीही असेच नग्न फोटो व्हायरल केल्याचे प्रकरण समोर आले होते ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी शिरूरमधील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात व उपनगरांमध्ये असे काही गैरप्रकार घडत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.
Cyber Crime Boy Friend Viral Nude Photo of Girl Friend
Pune Instagram