मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल्पवयीन मुलींसह महिलांना मोबाईलवरुन अश्लील क्लिप पाठवणाऱ्या एका तरूणाला पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत त्याने सुमार ६०० पेक्षा जास्त महिलांना त्रास दिल्याचे उघड झाले आहे. त्यांचे फोनही त्याने हॅक केल्याचे समोर आले आहे. त्याने मुंबईतील महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या मोबाईल फोनवर आणि तिच्या संपर्क यादीतील इतर मुलींना अश्लील व्हिडिओ पाठवणाल्या प्रकरणी एका पीडित विद्यार्थिनीने तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 आरोपी रवी दांडू ( वय ३० ) हा धारावी परिसरात राहणारा असून डाटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून एका खासगी बँकेत तांत्रिक विभागात कंत्राटावर काम करतो. विलेपार्ले महाविद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या संपर्क यादीतील सुमारे ३५ सहविद्यार्थिनींचा त्याने छळ तर केलाच, शिवाय त्यांना ब्लॅकमेलही करत असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, त्याने पीडितांचे मॉर्फ केलेले व्हिडिओ पाठवले होते आणि त्यांनी त्याच्यासोबत वेळ घालवण्याची मागणी केली होती. पोलिसांनी सांगितले की त्याने एका मुलीला त्याच्या सायनच्या घरी ब्लॅकमेल केले होते पण तिला अटक करण्यात आली. त्याला महिलांविषयी वाटणाऱ्या आकर्षणामुळे तो सोशल मीडियावर सुंदर मुलींचे फोटो न्याहाळत असे. त्यांचे फोटो डाऊनलोड करुन, मॉर्फ करुन अश्लील फोटो तयार करायचा. त्याद्वारे तो या महिलांकडे शरीरसुखाची मागणी करायचा. काही मुलींचे फोन हॅक करुन त्यांची बदनामी देखील करत असे.
यादरम्यान, १० मोबाईल फोन व १२ वेगवेगळ्या सिमचा वापर करून, अल्पवयीन मुलींसह अनेक महिलांना अश्लील कृत्य करण्यासाठी आणि ब्लॅकमेल करण्यात बदमाश यशस्वी झाला. बनावट कागदपत्रांचा वापर करून त्याने हे सिम मिळवले होते. त्याने व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवण्यासाठी अनेक महिला आणि अल्पवयीन मुलांची संपर्क यादी चोरली.
आतापर्यंत आरोपीने ६०० हून जास्त महिलांना ब्लॅकमेल केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यानंतर रवीने ब्लॅकमेलिंगची पद्धत बदलली होती. विद्यार्थिनींजवळ जाऊन बतावणी करायचा की, आपणही विद्यार्थी आहे आणि अभ्यासाच्या सामग्रीची देवाणघेवाण करण्याच्या बहाण्याने व्हॉसट्ॅप गृपला ऍड व्हायला सांगायचा.
त्यासाठी तो एक लिंक बनवून मुलींना पाठवायचा. ही लिंक ओपन केल्यानंतर त्यावर येणारा ओटीपी शेअर करायला सांगायचा. तो मिळताच मुलीच्या संपूर्ण मोबाइलचा ताबा तो स्वत:जवळ ठेवायचा. सायन येथील मुलीला त्याने अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तिचे मॉर्फ केलेले फोटो आणि व्हिडीओ तिच्या ३५ मित्र मैत्रिणींना पाठवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली.
मात्र, ही बाब मुलीने घरातल्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानुसार अंधेरी पोलिसांनी रवी दांडूवर गुन्हा दाखल केला आणि नंतर पोलिसांनी त्याला अटक केली. या तक्रारीनंतर अजूनही पीडित मुली तक्रार देण्यास पुढे येऊ शकतात अशी शक्यता
पोलिसांनी १० फोन जप्त केले असून ते फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवले जाणार आहेत. दांडूवर याप्रकरणी आणखी एफआयआर नोंदवण्यात आला आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
Cyber Crime 600 Women Molestation Suspected Arrested