शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ…या हेल्पलाईन क्रमांकावर करा संपर्क

by India Darpan
मार्च 5, 2025 | 7:04 am
in संमिश्र वार्ता
0
crime11

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- माहे नोव्हेंबर २०२४ अखेर पर्यंत सायबर गुन्ह्यांची उकल होण्याची टक्केवारी २२ टक्के होती. ती वर्षाअखेर म्हणजेच माहे डिसेंबर २०२४ अखेर पर्यंत २५ टक्के इतकी झाली आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये ६१३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून ६८३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची टक्केवारी १९ टक्के इतकी आहे. माहे डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत ७५३ गुन्हे उघडकीस आणले व ७४८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्हे उकल होण्याची ही टक्केवारी २२ टक्के इतकी आहे. यावरून सायबर गुन्ह्यांमध्ये उकल होण्याच टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.

एखादा सायबर गुन्हा घडल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे, केंद्र शासनाचे सायबर गुन्ह्यांच्या तक्रारीचे पोर्टल व हेल्पलाईन क्रमांक १९३० येथे संपर्क साधून तात्काळ माहिती देण्यात यावी अथवा तक्रार करावी, असे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

नोंद झालेल्या जास्तीत जास्त सायबर गुन्ह्यांची उकल करण्याच्या दृष्टीने पोलीस सतत प्रयत्नशील असतात. जास्तीत जास्त सायबर गुन्हे उघडकीस येण्याकरीता सायबर विभागात काम करणारे अधिकारी व अंमलदार यांना तांत्रिक तपासाचे वेळोवेळी अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येते. सायबर गुन्ह्यांची उकल होण्याच्या टक्केवारीत वाढ झालेली आहे. सायबर गुन्हे रोखण्याकरीता दैनंदिन स्तरावर पोलीस ठाणे हद्दीत घेण्यात येणाऱ्या नागरिकांच्या कॉर्नर मिटींग, सोसायटी मिटींग, जेष्ठ नागरिकांचे क्लब, झोपडपट्ट्या तसेच शाळा, महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी व त्याची कार्यपद्धती, सुरक्षा विषयक उपाय योजनांची माहिती देण्यात येत आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता फसवणूक करणाऱ्या अॅपपासून सावधानता बाळगण्याचे आवाहनही पोलीसांकडून करण्यात येत आहे.

मोहल्ला समित्या तसेच इतर जनतेच्या बैठकांमध्ये सायबर गुन्ह्यांची माहिती देवून वेळोवेळी चालणाऱ्या सायबर गुन्ह्यांच्या ट्रेंडविषयी जनजागृती करण्यात येत आहे. अनोळखी व्यक्तीकडून सोशल मीडियावर ‘फ्रेन्ड रिक्वेस्ट’ स्वीकारू नये व त्याला कोणताही प्रतिसाद देवू नये. शाळा व महाविद्यालयाच्या सभेमध्ये आणि निर्भया पथकाच्या बैठकांमध्ये देखील अनोळखी व्यक्तींच्या ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ व प्रतिसाद न देण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. हॅशटॅग #Thodasasochale अन्वये सायबर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी स्वतः पुढाकार घेऊन तयार केलेल्या व्हिडीओ/चित्रफित इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप व युट्यूबमार्फत प्रसारित करण्यात आल्या आहेत, असे सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त यांनी कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अबू आजमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन्ही सभागृहात मागणी

Next Post

९,९९९ रुपयांत हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन झाला लाँच… ही आहे प्रमुख वैशिष्ट्ये

Next Post
LAUNCHKV 16x9 copy 1 e1741138707488

९,९९९ रुपयांत हा पॉवरहाऊस स्‍मार्टफोन झाला लाँच… ही आहे प्रमुख वैशिष्ट्ये

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी बेकायदेशीर व्यवहार टाळावे, जाणून घ्या, रविवार, २२ जूनचे राशिभविष्य

जून 21, 2025
aditya thackeray e1703150861580

कुठल्याही भाषेला विरोध नाही…आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर केली ही पोस्ट

जून 21, 2025
crime1

वाहनचोरीचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागातून तीन मोटारसायकली चोरीला…

जून 21, 2025
Oplus_0

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत सरस प्रश्नांने रंगली…

जून 21, 2025
Untitled 70

नाट्य आणि चित्रपट अभिनेता तुषार घाडीगावकर याची आत्महत्या…

जून 21, 2025
crime 13

धक्कादायक…बाल्कनीत साठलेल्या पाण्याच्या वादातून लोटून दिल्याने एकाचा मृत्यू

जून 21, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011