शनिवार, ऑगस्ट 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सायबर-फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाने उचलले हे कडक पाऊल….

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 5, 2024 | 12:03 am
in संमिश्र वार्ता
0
crime11

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अलीकडच्या काळात, नागरिकांना भारतीय मोबाईल क्रमांकावरुन आले आहेत असे भासवणारे अनेक फसवे फोन कॉल्स येत आहेत. खरेतर हे कॉल्स परदेशातील सायबर गुन्हेगारांतर्फे फेरफार घडवण्यात आलेले कॉल्स आहेत. कॉल्सच्या मूळ उत्पत्तिस्थानाचा मुखवटा धरण करण्यासाठी हे गुन्हेगार कॉलिंग लाईन आयडेंटीटी (सीएलआय) चा गैरवापर करतात आणि त्याद्वारे मोबाईल क्रमांकाची सेवा खंडित करणे, खोटी डिजिटल अटक, तसेच अगदी सरकारी अधिकारी किंवा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे अधिकारी असल्याची बतावणी करून हे कॉल्स केले जातात. नुकत्याच घडलेल्या काही घटनांमध्ये नागरिकांना गुंगी आणणारी औषधे, अंमली पदार्थ यांच्या गैरव्यवहारात आणि सेक्स रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे खोटे आरोप करणारे कॉल्स आल्यामुळे, यासंदर्भातील चिंतेत आणखी भर पडली आहे.

यासंदर्भातील वाढत्या घटनांना प्रतिसाद देत केंद्रीय दूरसंचार विभागाने (डीओटी) दूरसंचार सेवा पुरवठादारांच्या (टीएसपीज) सहयोगासह एक प्रगत प्रणाली निर्माण केली आहे. फसवे आंतरराष्ट्रीय कॉल्स भारतीय दूरसंचार सेवेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ओळखून त्यांना रोखण्याच्या दृष्टीने या प्रणालीची विशेष रचना करण्यात आली आहे. ही यंत्रणा दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात येत आहे.: पहिला टीएसपी पातळीवरील टप्पा, जेथे मूळ ग्राहकाच्या क्रमांकावरून केले जाणारे फसवे कॉल्स रोखण्यात येतील; आणि दुसरा टप्पा, केंद्रीय स्तरावरील असेल, जेथे इतर टीएसपीजच्या ग्राहकांच्या क्रमांकांवरून होणारे फसवे कॉल्स रोखण्यात येतील.

आतापर्यंत, देशातील सर्व म्हणजे चारही टीएसपीजनी सदर यंत्रणा यशस्वीरित्या राबवली आहे. एकूण साडेचार दशलक्ष बनावट कॉल्सपैकी एक तृतीयांश कॉल्स भारतीय दूरसंचार क्षेत्राच्या जाळ्यात शिरण्याआधीच रोखण्यात आले आहेत. पुढील टप्प्यात, सर्वच टीएसपीजच्या माध्यमातून होणारे उर्वरित फसवे कॉल्स रोखण्यासाठी लागू करण्यात येणाऱ्या केंद्रीय प्रणालीचे कार्य लवकरच सुरु होईल.

फसवणूक करणारे लोक, मात्र, सामान्य जनतेला गंडा घालण्यासाठी नवनवीन पद्धती शोधून काढत आणि स्वीकारत आहेत. अशा नव्या पद्धती निदर्शनास आल्यानंतर लगेचच ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी डीओटी वेळेवर उपाययोजना हाती घेत आहे. तंत्रज्ञानाचा वेगाने उगम पावण्याच्या या युगात, डीओटीने दूरसंचार परिसंस्था अधिक निर्धोक तसेच सुरक्षित करण्यासाठी विविध उपाय अवलंबले आहेत. मात्र, इतकी मजबूत संरक्षण व्यवस्था उभारून देखील, फसवणूक करणारे इतर काही मार्गांनी लोकांची फसवणूक करण्यात यशस्वी होत असल्याच्या घटना घडत आहेत.

अशा वेळी, डीओटी नागरिकांना संशयास्पद फसव्या संभाषणाची माहिती सजगतेने विभागाला देण्यासाठी प्रोत्साहित करत आहे जेणेकरुन सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार सेवांचा होणारा गैरवापर ओळखून त्याला आळा घालण्यात डीओटीला मदत होईल. यामुळे तोतायागिरी, शोषण होण्यापासून नागरिकांचा बचाव होईल आणि अशा प्रकारच्या संभाव्य धोक्यांविरुद्ध सक्रीय कारवाई करणे शक्य होईल.

संचार साथी व्यासपीठावर उपलब्ध असलेल्या चक्षू सुविधेवर (https://sancharsaathi.gov.in/) नागरिकांनी अशा कॉलची तक्रार नोंदवावी, आणि यामध्ये फसवणुकीचे संशयित कॉल्स, एसएमएस आणि स्क्रीनशॉटसह व्हॉट्सॲप मेसेजेस, फसवणुकीचे माध्यम, संभाव्य फसवणुकीचा प्रकार, अशा स्वरूपाच्या संभाषणाची तारीख आणि वेळ हे सर्व तपशील द्यावेत. या तक्रारीची ओटीपी आधारित पडताळणी केली जाईल. चक्षू सुविधा, हे नागरिकांचे सायबर फसवणुकीपासून संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे.

दूरसंचार विभागाने केलेल्या कारवाईला आतापर्यंत मिळालेले यश:
· खोट्या/बनावट कागदपत्रांच्या आधारावर खरेदी केलेल्या 1.77 कोटी मोबाईलचे कनेक्शन खंडित करण्यात आले.
· देशातील सायबर गुन्हेगारी हॉटस्पॉट्स/जिल्ह्यांमधील 33.48 लाख मोबाइल कनेक्शन खंडित करण्याची आणि सायबर गुन्हेगारांनी या ठिकाणी वापरलेले 49,930 मोबाइल हँडसेट ब्लॉक करण्याची कारवाई.
· एका व्यक्तीसाठी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असलेले 77.61 लाख मोबाईल कनेक्शन खंडित करण्यात आले.
· देशभरात सायबर गुन्ह्यांमध्ये वापरलेले अथवा फसवणुकीशी संबंधित 2.29 लाख मोबाइल फोन ब्लॉक करण्यात आले.
· चोरीला गेलेल्या/हरवलेल्या 21.03 लाख मोबाईल फोन पैकी सुमारे 12.02 लाख शोधण्यात आले.
· गुन्हेगारी स्वरूपाचे एसएमएस पाठवण्यात सहभाग असलेल्या सुमारे 20,000 संस्था, 32,000 एसएमएस हेडर्स आणि 2 लाख एसएमएस टेम्पलेट खंडित करण्यात आले.
· खोट्या/बनावट कागदपत्रांच्या आधारावर खरेदी केलेल्या आणि सध्या बंद असलेल्या मोबाईल फोनशी जोडलेली सुमारे 11 लाख बँक खाती आणि पेमेंट वॉलेट गोठवली.
· खोट्या/बनावट कागदपत्रांच्या आधारावर खरेदी केलेल्या आणि सध्या बंद असलेल्या मोबाईल फोनशी जोडलेली सुमारे 11 लाख व्हॉट्सॲप प्रोफाइल/खाती व्हॉट्सॲपने बंद केली.
· 71,000 पॉइंट ऑफ सेलचा (सिम एजंट) काळ्या यादीत समावेश करण्यात आला. अनेक राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 365 एफआयआर नोंदवण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मेडिकल स्टोअर्स मध्ये चोरी…औषध सोडून रोकड, चॅाकटेल व साबनाचे बॅाक्स केले लंपास

Next Post

श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
WhatsApp Image 2024 10 04 at 9.00.01 PM

श्री एकविरा आई देवी मंदिर आणि परिसरातील विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी अनावश्यक खर्च टाळावे, जाणून घ्या, शनिवार, २ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 1, 2025
GxQsrFTXwAIoINM e1754055395573

कोल्हापूरच्या नांदणी मठाची माधूरी हत्तीण परत आणण्यासाठी मोहिम….वनताराचे सीईओंनी स्पष्ट केली भूमिका

ऑगस्ट 1, 2025
election11

भारताच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…या तारखेला मतदान

ऑगस्ट 1, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांनी ९ लाख रूपये किमतीच्या ऐवजावर मारला डल्ला

ऑगस्ट 1, 2025
fir111

नाशिकच्या व्यावसायिकास तब्बल २२ लाख रूपयाला गंडा…अशी केली फसवणूक

ऑगस्ट 1, 2025
daru 1

दारू पिण्यास पैसे दिले नाही म्हणून तरूणावर प्राणघातक हल्ला…गुन्हा दाखल

ऑगस्ट 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011