विशेष प्रतिनिधी, मुंबई
सराईत भामटे आता वेगवेगळ्या पद्धतीने ऑनलाइन फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांकडून जनजागृती सुरू झाल्यानंतर भामटे फसवणुकीची पद्धत बदलतात. आता ऑनलाइन डेटिंगद्वारे फसवणुकीची प्रकरणे उघड होऊ लागली आहेत. लोकांना जाळ्यात ओढल्यानंतर भामटे ब्लॅकमेलिंग करत आहेत. यामध्ये बहुतांश युवक आणि महिलांचा समावेश आहे. डेटिंग अॅपवर तरुण आणि तरुणींचे बनावट अकाउंट उघडून फसवणूक केली जात आहे. पडताळणीमध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पंडरी पोलिस ठाण्यात असेच एक फसवणुकीचे प्रकरण आले होते. या प्रकरणात युवकाची फसवणूक झाली होती. प्रकरणाची नोंद करून चौकशी सुरू झाली आहे. आतापर्यंत अनेक महिला आणि युवकांची फसवणूक झालेली आहे. परंतु पीडित भीती आणि संकोच असल्याने लोक तक्रारीसाठी पुढे येत नाहीयेत.
असे ओढतात जाळ्यात
डेटिंग अॅपमध्ये चॅटिंगदरम्यान भामटे खरे आयडी असलेल्या लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात. चॅटिंगमध्ये फसवणूककर्ता युवक आणि युवतींना आपला मोबाईल नंबर देतो. कोणी संपर्क केलाच तर संबंधिताला भामटे आपल्या जाळ्यात ओढतात. खरा आयडी असलेल्या पीडितांना हे भामटे थेट संपर्क करत नाहीत. पीडितांनी संपर्क केल्यानंतर ते वेगवेगळ्या सेवांची वेगवेगळी किंमत सांगतात. ऑनलाइन पेमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियाच्या माध्यमातून ते क्रमांक मागतात. त्यानंतर नव्या ऑफर आणि नव्या पद्धतीने सेवा देण्याच्या नावावर पैसे उकळण्यास सुरुवात करतात.
खासगी क्रमांकावर संपर्क केला की…
डेटिंग अॅपची मेंबरशिप घेण्यापासून ते चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी अॅपला पैसे अदा करावे लागतात. मेंबरशिप घेतल्यानंतर लोकांशी संपर्क सुरू केला जातो. परंतु व्हॉइस कॉलिंगचे पैसे अदा केले नाही तर सेवेचा लाभ मिळत नाही. याच पद्धतीतून सुटका होण्यासाठी लोग भामट्यांच्या खासगी क्रमांकार संपर्क साधतात. भामट्यांच्या सर्व आयडी बनावट असतात. खासगी क्रमांकावर संपर्क केल्यानंतर पीडित लोक भामट्यांच्या जाळ्यात फसले जातात.
अशा भामट्यांपासून रहा सावध
युवक आणि महिलांनी अशा प्रकारच्या अॅपचा वापर करताना सावध राहणे आवश्यक आहे. कोणत्याही खासगी क्रमांकावर फोन करू नये. कारण खासगी क्रमांकावर संपर्क केल्यास त्याची जबाबदारी डेटिंग अॅप घेत नसतात.
व्हिडिओ कॉलच्या अनेक तक्रारी
सायबर सेलमध्ये दररोज व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ कॉल आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार मिळत आहेत. बहुतांश युवक-युवती तक्रारदार आहेत. दररोज तीन ते चार तक्रारी मिळत आहेत. मुलीच्या नावावर फेसबुक आयडी बनवून भामटे गोड बोलून मोबाईल क्रमांक मिळवतात. व्हिडिओ कॉल करून त्याची एडिटिंग करून अश्लील व्हिडिओ पाठवतात. त्याबदल्यात धमकी देऊन पैशांची मागणी करतात.