इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. काल शुक्रवार, दि. ६ ऑगस्ट हा स्पर्धेचा आठवा दिवस होता. सध्या भारत २० पदकासह पदकतालिकेत सातव्या स्थानावर आहे. भारताने आतापर्यंत ६ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्य पदक जिंकली आहेत. तसेच बॉक्सिंगमध्ये भारताच्या खेळाडूंनी ७ पदक निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे भारताच्या दीपक पुनियाने बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनामचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले.
कुस्तीतील भारताचे हे तिसरे सुवर्ण पदक आहे. दीपक पुनिया याच्यापूर्वी बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनी सुवर्णपदक जिंकले असून कुस्तीपटू दीपक पुनिया याने भारताला यंदाच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील नववे सुवर्णपदक मिळवून दिले. बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक या दोघांच्या विजेतेपदानंतर दीपक पुनियाच्या मॅचकडेच साऱ्यांचे लक्ष होते. दीपक पुनियाने अपेक्षेप्रमाणे प्रतिस्पर्ध्याला पाणी पाजले आणि सुवर्णपदाकवर नाव कोरले. दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या मुहम्मद इनाम याला ३-० असं पराभूत केले. कालच्या दिवसात हे कुस्तीमध्ये भारताला मिळालेले तिसरे सुवर्णपदक ठरले.
दीपक पुनियाने 2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आतापर्यंतचे सर्वात संस्मरणीय सुवर्णपदक मिळवून दिले. फ्रीस्टाइल 86 किलो गटात पाकिस्तानच्या मोहम्मद इनामचा पराभव करून त्याने ही कामगिरी केली. इनामविरुद्ध पुनियाने जबरदस्त कामगिरी केली. त्याने पाकिस्तानी कुस्तीपटूला एकही संधी दिली नाही. दीपकने हा सामना 3-0 ने जिंकला. भारताचे हे तिसरे सुवर्ण आणि कुस्तीतील एकूण चौथे पदक आहे.
#CWG2022 : A glorious victory for @WeAreTeamIndia in the wrestling. Bajrang Punia, Sakshi Malik, Deepak Punia claim top honours in wrestling. They carry off three gold medals! ?#CWG2022#Cheer4India@Media_SAI@YASMinistry @birminghamcg22 pic.twitter.com/QqfjQLTbUq
— DD News (@DDNewslive) August 6, 2022
यापूर्वी अंशू मलिकने रौप्य, बजरंग पुनियाने सुवर्ण आणि साक्षी मलिकनेही सुवर्णपदक पटकावले होते.
भारताचा दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनियाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग दुसरे सुवर्णपदक जिंकले. त्याने फ्रीस्टाइल 65 किलो गटात कॅनडाच्या लचलान मॅकनीलचा 9-2 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. भारतीय महिला कुस्तीपटू साक्षी मलिक हिने ६२ किलो वजनी गटात कॅनडाच्या गोडीनेज गोन्झालेझ हिला पराभूत करत गोल्ड मेडल मिळवलं.
साक्षी पहिल्या फेरीत ०-४ अशी पिछाडीवर होती पण दुसऱ्या फेरीत साक्षीने प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलाच दम दाखवला. तिने गोडीनेज गोन्झालेझला चितपट करून तिची पाठ टेकवली आणि ४-४ अशा बरोबरीसह सुवर्ण पदकावर नाव कोरलं. साक्षीने प्रतिस्पर्ध्याला चितपट केल्याने तिला विजेती जाहीर करण्यात आलं. त्याआधी बजरंग पुनिया याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले, कुस्तीच्या ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कॅनडाच्या लाचलन मॅकनील याचा ९-२ असा अतिशय सहज पराभव केला.
सुरूवातीला भारताची महिला कुस्तीपटू अंशू मलिक हिने ५७ किलो फ्री स्टाइल प्रकाराच्या अंतिम फेरीत रौप्यपदकाची कमाई केली. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोये हिच्याकडून अंशूला ७-३ ने पराभूत व्हावे लागले. त्यामुळे अंशूला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. अंशू मलिकने उपांत्य फेरीत श्रीलंकेच्या नेथमी पोरुथोत्झचा आणि उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या इरेन सिम्नेडीसचा १०-० असा पराभव केला होता. पण फायनलमध्ये तिने रौप्यपदक जिंकले.
बर्मिंगहॅममधील कुस्तीतील भारताचे हे पहिले आणि एकूण सहावे सुवर्णपदक आहे. बजरंगने यापूर्वी 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. त्याचबरोबर 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. यावेळी कुस्तीतील भारताचे हे दुसरे पदक आहे. बजरंगच्या आधी अंशू मलिकने रौप्य पदक जिंकले होते. साक्षी मलिकने फ्रीस्टाइल 62 किलो वजनी गटात कॅनडाच्या अॅना गोडिनेझ गोन्झालेझचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. साक्षीने विरोधी खेळाडूला पहिला फटका मारून चार गुण मिळवले. त्यानंतर पिनबॉलसह ऐतिहासिक विजयाची नोंद केली. साक्षी मलिकचे हे पहिले सुवर्ण आहे. साक्षीने यापूर्वी कॉमनवेल्थ गेम्समध्ये रौप्य (2014) आणि कांस्यपदक (2018) जिंकले होते.
यापुर्वी भारताच्या अंशू मलिकने 57 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते. मात्र, अंतिम सामन्यात सुवर्णपदक जिंकण्यापासून ती हुकली. या स्पर्धेत नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोयेने सुवर्णपदक पटकावले. नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुरोयेने अंतिम फेरीच्या पहिल्या फेरीत चार गुण मिळवले. यानंतर अंशूने दुसऱ्या फेरीत पुनरागमन करत चार गुण मिळवले, पण नायजेरियाच्या ओडुनायो अडेकुओरोयेनेही दुसऱ्या फेरीत दोन गुण मिळवले. अशा स्थितीत अंशूला सुवर्णपदक जिंकता आले नाही व अंशू मलिकला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
CWG 2022 India Win Third Gold Medal In Wrestling