गुरूवार, सप्टेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

धक्कादायक! भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने खेळविले कोरोनाबाधित खेळाडूला

by Gautam Sancheti
ऑगस्ट 9, 2022 | 5:38 am
in संमिश्र वार्ता
0
FZhjrg8agAEcGeX scaled e1659978019838

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंग्लंडमधील बर्गिंहॅम येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्पर्धेच्या नवव्या दिवशी म्हणजेच भारताने तब्बल १४ पदकांवर आपले नाव कोरले, यामध्ये ४ सुवर्ण, ३ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश होता. एवढेच नाही तर भारताच्या महिला क्रिकेट संघाने उपांत्यफेरीत यजमान इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तसेच टेबल टेनिस, बॉक्सिंग आणि हॉकी यांसारख्या खेळांमध्ये देखील भारताने पदकाकडे कूच केली आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील राष्ट्रकुल महिला क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोरोना संसर्गाचं प्रकरण समोर आलं आहे. सामन्याच्या मध्यंतरी ऑस्ट्रेलियाची खेळाडू ताहलिया मॅकग्राला कोरोना संसर्ग झाल्याची माहीती समोर आली होती. विशेष बाब म्हणजे असे असतानाही तिला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करून खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, अष्टपैलू खेळाडू ताहलिया मॅकग्राला सामन्यापूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आले पण, तिला राष्ट्रकुल क्रीडा महासंघ आणि आयसीसीनं खेळण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे तिचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला, असं निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे इतर खेळाडूंना देखील कोरोनाच्या संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत प्रथमच असा प्रकार घडत असल्याचे दिसून येते.

विशेष म्हणजे प्रथमच या खेळांमध्ये समाविष्ट असलेल्या महिला T20 क्रिकेटचा पहिला चॅम्पियन कोण असेल हे ठरविण्याचा दिवस आला आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय क्रिकेट संघही सुवर्णपदकाच्या दावेदारात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर सुरू आहे. कॉमनवेल्थ गेम्समध्ये 14 वर्षांनंतर क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. याआधी, 1998 मध्ये प्रथम आणि एकमेव क्रिकेट खेळले गेले होते, परंतु नंतर त्यात पुरुषांच्या एकदिवसीय स्वरूपाचा समावेश करण्यात आला.

1998 मध्ये भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकला नव्हता, मात्र ऑस्ट्रेलियाने अंतिम सामना खेळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. फॉरमॅट वेगळा आहे, पण ऑस्ट्रेलिया पुन्हा फायनलमध्ये आहे. फरक हा आहे की यावेळी भारतही या फायनलचा भाग आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांची कामगिरी दमदार राहिली आहे.

विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने एकही सामना गमावलेला नाही. त्याला पहिल्या सामन्यातच भारताकडून सर्वात मोठे आव्हान मिळाले होते, मात्र त्यानंतर टीम इंडियाने विजयाची संधी गमावली. मात्र, यानंतर भारताने पुनरागमन करत उपांत्य फेरीत पाकिस्तान, बार्बाडोस आणि त्यानंतर यजमान इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली. मात्र कोरोनामुळे खेळाडूंनी काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगण्यात येते.

CWC India Australia Covid Positive Player
CWG22 Commonwealth Games 2022 Cricket Women Team

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

१२ हजारांपेक्षा कमी किंमतीच्या चिनी स्मार्टफोनवर भारतात बंदी?

Next Post

रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील या तीन सहकारी बँकांवर कारवाई

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

image005V4IZ
संमिश्र वार्ता

सेनादलांतील या दहा महिला अधिकारी नऊ महिन्यांत २६ हजार सागरी मैलांचा प्रवास पूर्ण करणार…

सप्टेंबर 11, 2025
HYRYDER LE car 1 1
संमिश्र वार्ता

टोयोटा किर्लोस्‍कर मोटरकडून नवरात्री निमित्त ही ऑफर…१ लाख रूपयांहून अधिक फायदा

सप्टेंबर 11, 2025
ASHTAVINAYAK 2 1024x682 1
राज्य

अष्टविनायक विकास आराखडा….उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले हे निर्देश

सप्टेंबर 11, 2025
crime 88
क्राईम डायरी

नाशिकमध्ये वेगवेगळया भागात चार घरफोड्या…तीन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

सप्टेंबर 11, 2025
Untitled 11
संमिश्र वार्ता

धक्कादायक….महसूल अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी रेती माफियांकडून ड्रोनचा वापर

सप्टेंबर 11, 2025
ladki bahin yojana e1722514675247 750x375 1
संमिश्र वार्ता

लाडकी बहिण योजनेतील ऑगस्टचा सन्मान निधी तुमच्या खात्यात जमा झाला का? चेक करा बँक खाते

सप्टेंबर 11, 2025
crime1
क्राईम डायरी

नाशिकच्या महिलेसह तिघांना सव्वा कोटीला गंडा….अशी केली फसवणूक

सप्टेंबर 11, 2025
Untitled 10
संमिश्र वार्ता

यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड…१२ ठिकाणी छापे, ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

सप्टेंबर 11, 2025
Next Post
rbi 2 e1699103501653

रिझर्व्ह बँकेची महाराष्ट्रातील या तीन सहकारी बँकांवर कारवाई

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011