बजाज फायनान्स कंपनी विरोधात
सामान्य माणसाचा लढा यशस्वी
मी दादा परबत राऊत (रा. पोंधवडी ता.करमाळा सोलापूर). मी दिनांक 13/ 07/2019 रोजी फ्लिपकार्ट ऍप वरून नवीन मोबाईल ऑनलाईन घेतला. बजाज फायनान्स EMI कार्ड वरून घेतला होता. मी 30/09/2019 रोजी दोन महिन्यांत पूर्ण EMI ऑनलाईन भरुन त्याच दिवशी ऑनलाईन एनओसी देखील मिळवली होती. पण पुर्ण EMI भरल्यानंतरही दिनांक 02/10/2019 रोजी आणि 04/10/2019 रोजी अनुक्रमे 295 + 295 रुपये चार्ज अकाउंट मधून कट करण्यात आला.
मी पैसे कट करण्याचे कारण बँकेमध्ये विचारले. बँकेने मला सांगितले की, बजाज फायनान्सचे तुमच्या वरती कर्ज आहे त्यांनी ऑनलाईन बँकेला ECS टाकल्यामुळे तुमच्या खात्यात मिनीमम बॅलन्स नसल्यामुळे तुम्हाला चार्ज लागला आहे. मी बँकेला सांगितले बजाज फायनान्सचे कर्ज वनटाईम भरले आहे. माझ्याकडे एनओसी पण आहे, तरीही बँक ऐकून घेत नव्हती. अखेर बजाज फायनान्सला याबद्दल विचारणा केली. त्यांनीही उडवाउडवीचे उत्तरे दिली.
मग मी माहिती अधिकार महासंघाचे कार्यअध्यक्ष शेखर कोलते, राहुल कदम, ग्राहक पंचायतीचे विजय सागर, वकील उदय चव्हाण यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांना कायदेशीर सल्ला मागितला. सर्वांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्राहक मंच औरंगाबाद येथे मी तक्रार दाखल केली. फक्त 590 रुपयांसाठी अडीच वर्षे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर त्यात यश संपादन प्राप्त केले. माननीय जिल्हा ग्राहक मंच औरंगाबाद यांनी बजाज फायनान्स यांना 10 हजार रुपये दंड ठोठावला. अतिरिक्त 590 रुपये कट झालेले आणि त्यावरील 3.25 टक्के व्याजाने देण्याचा निकाल दिला आहे. मला एकच म्हणायचे आहे की, सामान्य माणसाला पण न्याय मिळतो फक्त लढण्याची तयारी पाहिजे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या सर्व पदाधिकारी आणि मला मार्गदर्शन करणाऱ्यांचे आभार.
श्री दादा परबत राऊत, पोंधवडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर 9423834207
Customer Win Case Against Bajaj Finance Ltd Jago Grahak Jago
Consumer Forum