नवी दिल्ली – ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे सध्या विविध सेल सुरू आहेत. फ्लिपकार्टही त्यापैकीच एक आहे. एका ग्राहकाने उत्साहात आयफोन बुक केला. त्यामुळे त्याला त्याच्या कुरिअरची मोठी उत्सुकता होती. कारण, त्याच्या आय़ुष्यातील हा पहिलाच आयफोन होता. मात्र, जेव्हा कुरिअर आले तेव्हा त्यात आयफोन तर सोडाच पण चक्क कपडे धुण्याचे दोन साबण निघाले. हा सर्व प्रकार ग्राहकाने कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळेच हा व्हिडिओ सध्या खुपच व्हायरल झाला आहे. बघा हा व्हिडिओ