गुरूवार, नोव्हेंबर 6, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पैसे मिळविण्यासाठी ठेवीधारकाने बँकेत घातला असा गोंधळ

ऑगस्ट 25, 2022 | 5:06 am
in राष्ट्रीय
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्या जवळील जमापुंजी ही बँकेत ठेवण्याला अनेक जण प्राधान्य देतात. मोठ्या विश्वासाने ग्राहक हा व्यवहार करतो. पण, जेव्हा ग्राहकाला अडचण असते तेव्हा त्याला पैसे मिळाले नाही तर काय होते याचा प्रत्यय आला आहे. ही घटना भारतातील नाही तर लेबनॉन मधील आहे. बेरूतमध्ये एका बंदूकधाऱ्याने बँकेत घुसून कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस ठेवले. माझ्या बँकेत अडकलेल्या ठेवी द्या, अन्यथा मी स्वत:ला पेटवून घेईन, असे सांगितले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीचे नाव बसम अल-शेख हुसैन ( वय ४२ ) असे आहे. बेरूतच्या हमरा जिल्ह्यातील फेडरल बँकेत त्याने कथितपणे प्रवेश केला. त्याच्याकडे पेट्रोलचा डबाही होता. अनेक तासांच्या संघर्षानंतर आणि बँक अधिकाऱ्यांनी तात्काळ पैसे देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आरोपींनी आत्मसमर्पण केले. मात्र, ज्यांच्या उपस्थितीत मध्यस्थी झाली त्या वकिलाचे म्हणणे आहे की, आरोपींना अद्याप एक रुपयाही मिळालेला नाही.

लेबनॉन हा प्रजासत्ताक देश असून पश्चिम आशियातील भूमध्य समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेला आहे. लेबनॉनमध्ये 2020 पासून आर्थिक टंचाई निर्माण झाली असून बँकांमध्ये देखील पैसा नाही, त्यामुळे नागरिकांना स्वतःच्या खात्यातील पैसे काढण्यास देखील अडचणी येत आहेत, रोखीची कमतरता आहे आणि बँकांमधून परकीय चलन काढण्यावर कठोर निर्बंध आहेत. यामुळे कोणतीही व्यक्तीही पैसे काढू शकत नाही. त्यातच ही घटना घडली आहे.

लेबनीज सैनिक, देशाच्या अंतर्गत सुरक्षा दलाचे पोलीस अधिकारी आणि गुप्तचर यंत्रणांनी परिसराला वेढा घातला. हुसैन यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्याचा अधिकारी प्रयत्न करत राहिले, मात्र त्यांना यश मिळाले नाही. हुसेनने नंतर एका ओलिसाची सुटका केली. बँकेच्या आत मोबाईलवरून रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये आरोपी हातात शॉटगन घेऊन पैसे परत मागत असल्याचे दिसत आहे. दुसर्‍या व्हिडिओमध्ये, दोन पोलिस अधिकारी त्याच्याकडे किमान एक ओलिस सोडण्याची विनंती करत आहेत, परंतु त्याने नकार दिला.

बँक एम्प्लॉईज सिंडिकेटचे प्रमुख जॉर्ज अल हज यांनी सांगितले की, आरोपींनी सुमारे 8 कर्मचाऱ्यांना तसेच दोन ग्राहकांना ओलीस ठेवले. इशारा देण्यासाठी त्याने तीन गोळ्याही झाडल्या. त्याचे सुमारे दोन लाख डॉलर्स बँकेत अडकले असल्याचे सांगण्यात येत आहे. खरं तर, लेबनॉनमध्ये 2019 च्या अखेरीपासून रोखीची कमतरता आहे आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याचा भाऊ आतिफने असोसिएटेड प्रेसला सांगितले की, जर बँकेने हुसैनचे पैसे परत केले तर तो आत्मसमर्पण करेल, कारण त्याला त्याच्या वडिलांची वैद्यकीय बिले भरण्यासाठी आणि कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी पैशांची गरज आहे. आतिफने सांगितले की, त्याच्या भावाचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही, त्याने पैसे घेण्यासाठी मजबुरीने हे केले आहे.

दरम्यान, या घटनेत पळून गेलेल्या बँकेच्या एका ग्राहकाने स्थानिक मीडियाला सांगितले की, रुग्णालयात दाखल केलेल्या त्याच्या वडिलांच्या उपचारासाठी तो 2,000 डॉलर्स काढण्याची मागणी करत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डझनभर आंदोलकांनी परिसरात येऊन लेबनीज सरकार आणि बँकांच्या विरोधात घोषणाबाजी केली. आरोपीला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
लेबेनॉनला भूमध्य सागरी प्रदेश व अरबी द्वीपकल्पाच्या सीमेवर वसल्यामुळे लेबेनॉनास समॄद्ध इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभला आहे. मात्र १९७५ ते १९९० दरम्यान चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये लेबेनॉनमधील पायाभुत सुविधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सन २००६मध्ये लेबेनॉनच्या हिझबुल्ला ह्या अतिरेकी पक्षाने इस्रायलसोबत पुकारलेल्या युद्धामध्ये लेबेनॉनची पुन्हा पडझड झाली.
लेबनान सध्या त्याच्या आर्थिक इतिहासातील या आर्थिक संकटाच्या काळात आहे.

देशातील तीन चतुर्थांश जनता सध्या गरिबीत आहे. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत लेबनानी पाऊंड 90 टक्क्यांनी घसरलेला आहे. बँकेतून रोख रक्कम काढण्यावर मर्यादा टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे ग्राहकांना पैसे मिळवण्यात अडचणी येत आहेत. स्वतः च्याच खात्यातील पैसे काढण्यासाठी, एका व्यक्तीने 10 बँकेच्या कर्मचाऱ्यांना बंदुकीच्या धाकाने ओलीस ठेवले असल्याची घटना समोर आली आहे. लेबनानच्या राजधानीत बेरुतमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे. मागण्या मान्य कराव्यात यासाठी या आरोपीने तीनदा हवेत गोळीबारही केलेला आहे.

फेडरल बँकेच्या एका शाखेत हा प्रकार घडला असून, या आरोपीचे नाव अलशेख हुसेन ( वय ४२ ) अशी झाली आहे. या अलशेख हुसेन याचे 1कोटी 60 लाख रुपये या बँकेत जमा आहेत. मात्र बँकेने पैसे देण्यास त्याला नकार दिला आहे. त्यामुळे नाराज झालेल्या अलशेख याने बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओलीस ठेवले होते. आपल्या खात्यातील पैसे काढू द्यावेत ही त्याची मुख्य मागणी आहे. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी तो आग्रही होता. अखेरीस त्याला अटक केल्यानंतर हे ओलीस नाट्य संपले.

सध्या लेबनानमध्ये अनेक बँकांच्या बाहेर गर्दी आहे, पैसे निघत नसल्याने नागरिक वैतागलेले आहेत. लोकांनी या बँकेच्या बाहेर गर्दी करत अलशेखच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत आणि सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. सरकार अपयशी झाल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आपले स्वतःचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी हा संघर्ष करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. ही स्थिती उद्भवली नसती तर कुणीच कायदा हाती घेतला नसता असे सर्वसामान्यांचे मत आहे.

Customer Bank Money Return Demand Crime
Lebenon Police Beirut

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नेमकं काय स्वस्त? ओटीटी, चित्रपट की नाटक? बघा ही आकडेवारी

Next Post

मासिक पाळी उशीरा येते आहे? ही असू शकतात कारणे…

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, ७ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 6, 2025
rohit pawar
इतर

डोनाल्ड ट्रम्प यांचे खोटे आधारकार्ड बनविले… आमदार रोहित पवार अडचणीत…

ऑक्टोबर 29, 2025
post
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक, धुळे,जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातील पोस्ट पार्सल सुविधेबाबत मोठा निर्णय… मिळणार हा फायदा…

ऑक्टोबर 29, 2025
IMG 20251029 WA0033
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये रंगणार एमआरएफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार…

ऑक्टोबर 29, 2025
salher
मुख्य बातमी

साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…

ऑक्टोबर 29, 2025
Next Post
stomach pain

मासिक पाळी उशीरा येते आहे? ही असू शकतात कारणे...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011