नाशिक – देश विदेशात प्रसिद्ध असलेल्या नाशिकरोड येथील इंडिया सिक्युरिटी अँड करन्सी नोट प्रेस मधील मजदूर संघाच्या निवडणुकीत कामगार पॅनलने विजयाची हॅट्रिक साधली. आपला पॅनल चा या निवडणुकीत पुन्हा धुव्वा उडविला. मात्र आपला पॅनल ने कार्यकारी सदस्य मधील दोन जागा जिकण्यात यश मिळवले.
मजदूर संघाच्या तीस जागा आहे. अध्यक्ष ची निवड दर वेळी बिनविरोध केली जाते. त्यामुळे कामगार नेते जयवंत भोसले पुन्हा अध्यक्ष झाले आहेत. राहिलेल्या २९ जागासाठी १०एप्रिल ला ९५ टक्के मतदान झाले.या मतदान प्रक्रियेत२५४२पैकी२४१७ मतदारांनी सहभाग घेतला.
या निवडणुकीत कामगार पॅनल चे नेतृत्व जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी तर आपला पॅनल चे नेतृत्व अशोक गायधनी, रामभाऊ जगताप यांनी केले. प्रतिष्ठेच्या सरचिटणीस पदी जगदीश गोडसे यांनी रामभाऊ जगताप यांचा तर कार्याध्यक्ष पदी जुंद्रे यांनी अशोक गायधनी यांचा पराभव केला.
उपाध्यक्ष पदी कामगार पॅनलचे जयराम कोठुळे(११३४),राजेश टाकेकर(१३१४),कार्तिक डांगे(१२०१),प्रवीण बनसोड(१०८६) विजयी झाले. खजिनदार पदी अशोक पेखळे(१११२)यांनी बाजी मारली. जॉईंट सेक्रेटरी च्या सर्व सहा जागांवर कामगार पॅनलच्या संतोष कटाले(१२४८),रमेश खुळे(११३५),राजू जगताप(९९१)अशोक जाधव(१०३८),अविनाश देवरुखकर(१२०३),व इरफान शेख(१०३१) यांनी विजय मिळवला.
कार्यकारी सदस्य च्या १६ पैकी १४ जागा जिंकुन कामगार पॅनल ने वर्चस्व राखले.तर आपला पॅनल च्या पदरी दोन जागा मिळाल्या.यात कामगार पॅनल चे मनीष कोकाटे, किशोर गांगुर्डे, दत्ता गांगुर्डे,अरुण गीते, संजय गुंजाळ, संपत घुगे,लहानु चंद्रमोरे, सुदाम चौरे, आप्पासाहेब ताजनपुरे, भगवान बिडवे, दशरथ बोराडे, कैलास मुठाळ,संदीप व्यवहारे, मनोज सोनवणे तर आपला पॅनलचे काशिनाथ पाटोळे व किरण गांगुर्डे विजय झाले. वर्क्स कमिटीची मतमोजणी आज सुरू झाली असून संध्याकाळ पर्यंत तिचा कैल अपेक्षित आहे. त्यात ही कामगार पॅनल बाजी मारेल असा दावा कामगार पॅनल ने केला आहे.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना नवनिर्वाचित कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे व सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले की २०१२ पासून सत्ता हाती आल्यानंतर कायम कामगार हिताचे निर्णय घेतले. कामगारांना विश्वासात घेतले. कामगाराना सेवानिवृत्ती नंतर मेडिकल पॉलिसी, रजा विकण्याचा अधिकार, डबल ग्रॅज्युएटी,मयत कामगार वारसांचा प्रश्न,सातवा वेतन आयोग, प्रोमोशन पोलिसी, दिवाळी बोनस,अशा अनेक कामगार हिताच्या योजना व्यवस्थापना पुढे प्रभावीपणे मांडल्या आणि त्यात कामगारांच्या पाठीराखे यामुळे यशस्वी झाल्या. कामगारांची आर्थिक प्रगती टिकवून ठेवली.
कोरोना काळात गंभीर प्रसंगी केंद्र व राज्य शासनाचे नियम पाळून कारखान्यात कामगारांच्या आरोग्यासाठी हँडवॉश,सॅनिटायझर आदी सुविधा पुरविण्यात आल्या. कामगारामधील जो कामगार कोरोना रुग्ण राहिला त्यासाठी खाजगी रुग्णालयात जे काही होईल खर्च होईल तो व्यवस्थापनाकडून मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.
कोरोना विषाणूच्या आजाराने इंडिया सिक्युरिटी प्रेस मधील१७ व करन्सी नोट प्रेस मधील१५आशा एकूण ३२ कामगारांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना प्रत्येकी २५ लाख रुपये मिळवून देण्यासाठी कामगार पॅनेलने पुढाकार घेऊन व्यवस्थापनाला तो देण्यास भाग पाडले. त्यामुळे कामगारांनी कामगार पॅनल वर विश्वास ठेवला आणि मोठ्या मताधिक्याने कामगार पॅनलच्या हाती तिसऱ्यांदा सत्तेचे सूत्र दिले.
हा विजय कामगार पॅनलचे पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त कामगार यांना समर्पित केला. कोरोना मुळे ज्या कामगार बांधवांचा मृत्यू आहे झाला आहे, त्यांचे स्मरण होत आहे, असे नवनिर्वाचित कार्य अध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे व सरचिटणीस जगदीश गोडसे यांनी सांगितले.