विशेष प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारच्या निर्देशानुसार नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोना निर्बंध शिथील होत आहेत. मात्र, नाशिककरांना सायंकाळी पाचच्या आत घर कुठल्याही परिस्थितीत गाठावे लागणार आहे. कारण, सायंकाळी ५ वाजेनंतंर शहरासह जिल्ह्यात संचारबंदी (कर्फ्यू) लागू होणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश काढले आहेत. त्यानुसार सायंकाळी ५ ते पहाटे ५ या वेळेत शहरासह जिल्ह्यात संचारबंदी असणार आहे. तर, पहाटे ५ ते सायंकाळी ५ या वेळेत जमावबंदी असणार आहे. त्यामुळे दिवसा ५ पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास परवानगी नसेल. जमावबंदी किंवा संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
शहरासह जिल्ह्यात सर्व उद्योग आणि व्यवसाय यांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. कंपनीतील कामगार किंवा कार्यालय व व्यवसायातील व्यक्तींना घरी जाण्यासाठी दुपारी ४ ते ५ वाजेपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपासून शहरात व जिल्ह्यात संचारबंदी लागू होणार आहे. यापूर्वी रात्रीची संचारबंदी होती. मात्र, आता सायंकाळी आणि रात्री संचारबंदी राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना ५ वाजेपर्यंतच घराबाहेर पडता येणार आहे. संचारबंदी काळात केवळ महत्त्वाच्या किंवा अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडता येईल. तसेच, यासंबंधीची कागदपत्रे सोबत बाळगावी लागतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हे आदेश खालीलप्रमाणे