नाशिक – राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत काही प्रमाणात कोरोना निर्बंधांमध्ये शिथीलता दिली आहे. मात्र, अद्यापही धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. त्यातच उद्यापासून श्रावण महिना सुरू होत आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर या शिव मंदिरात श्रावण सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी होते. तसेच तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी फेरीसाठी भाविक हजारोच्या संख्येने येतात. सध्या राज्यात लागू असलेल्या कोरोना निर्बंधांमुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसे आदेश प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांनी काढलेले आहेत.
हे आदेश असे