नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राला ७५ लाखाचा CSR मंजुर झाला आहे. Epirock Company Ltd यांच्याकडून अखंडित वीज पुरवठा व्हावा यासाठी Solar Electricity Generation- Green Project अंतर्गत १२५ KW सौर ऊर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आल्याची माहिती विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर सागर वैद्य यांनी दिली.
ते म्हणाले की, या संबंधीचा पत्रव्यवहार कंपनीने नुकताच विद्यापीठाशी केला असून लवकरच कंपनी आणि विद्यापीठात या संदर्भातला MOU प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रकल्पामुळे उपकेंद्राचे लाखो रुपयांचे वीज बिल बचत होणार असून सौर ऊर्जेचा वापर होवून पर्यावरण पूरक उपक्रमही ठरणार आहे.
सदर CSR मिळवण्यासाठी गेली ८ महिने मी सतत केलेल्या पाठपुराव्याला यश आल याचा विशेष आनंद आहे. याकामी उपकेंद्राचे सहायक कुलसचिव श्रीपाद बुर्कुले आणि इतरांचेही वेळोवेळी सहकार्य मिळाले. भविष्यात अजूनही अनेक गुड न्यूज़ उपकेंद्राबाबत आहेत. ज्याद्वारे उपकेंद्र उभारणीसाठी खर्च होणारे विद्यापीठाचे कोट्यावधी रुपये वाचणार आहेत.