मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दहा हजार रुपयांपेक्षा जास्त व्हर्च्युअल डिजिटल मालमत्ता किंवा क्रिप्टोकरन्सीच्या पेमेंटवर १ टक्के टीडीएस कपात करण्याच्या नियमांबाबत सरकारने अधिसूचना जारी केली आहे. येत्या १ जुलैपासून हा नियम लागू होणार आहे. यासाठी अर्थ कायदा २०२२ ने आयटी कायद्यात कलम १९४S आणले आहे. आयकर विभागाने आभासी डिजिटल मालमत्तेवर टीडीएस कपातीबाबत तपशीलवार खुलासा सादर केला असून, त्यानुसार क्रिप्टोच्या पेमेंटची तारीख आणि पेमेंट मोड सांगणे गरजेचे असणार आहे.
या नवीन तरतुदी लागू करण्यासाठी, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) २१ जून रोजी फॉर्म २६QE आणि फॉर्म १६E मध्ये टीडीएस रिटर्न भरण्यासंबंधी आयकर नियमांमध्ये काही सुधारणा केल्या आहेत. त्यानुसार सीबीडीटीने म्हटले आहे की कलम १९४S अंतर्गत गोळा केलेला टीडीएस ज्या महिन्यात कपात केली जाईल त्या महिन्याच्या अखेरीस ३० दिवसांच्या आत जमा होईल. वजा केलेला कर २६QE चालान-सह-विवरण फॉर्ममध्ये जमा केला जाईल.
तज्ज्ञांनी या बदलत्या नियमांमध्ये काय लक्षात ठेवावे याबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले, फॉर्म २६QE जमा करण्यासाठी आभासी डिजिटल मालमत्ता, मूल्य, पद्धत, आभासी डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाची तारीख सांगणे आवश्यक आहे.
जगभरातील गुंतवणुकदारांबरोबरच भारतातील गुंतवणुकदारांनीही आभासी मालमत्तेत पैसे गुंतवायला सुरुवात केली आहे. कमी काळामध्ये जास्त फायदा होत असल्याने क्रिप्टो करन्सी कमी काळातच लोकप्रिय झाली. जगभरात महागाईचं वाढतं प्रमाण आणि मंदावलेली जागतिक अर्थव्यवस्था यामुळे क्रिप्टोमध्ये गुंतवण्याचा उत्साहदेखील मावळला आहे. पण भारतात अद्याप क्रिप्टोला चांगली पसंती मिळते आहे
cryptocurrency digital transaction new rule from 1 july 2022 bitcoin tds cbdt