नवी दिल्ली – गेल्या काही वर्षात प्रत्यक्ष चोरी किंवा दरोडे टाकण्यापेक्षा ऑनलाइन सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढले असून या माध्यमातून करन्सी चोरण्याचे प्रकार देशभरात नव्हे तर जगात वाढले आहेत. काही हॅकर्सनी आतापर्यंतची सर्वात मोठी हॅकिंग केली आहे. डिजिटल चलन क्रिप्टोकरन्सीचे हे हॅकिंग आहे. क्रिप्टोकरन्सी ट्रान्सफरसाठी ओळखल्या जाणाऱ्या पॉली नेटवर्क या कंपनीने सांगितले की, हॅकर्सने त्यांचे नेटवर्क फोडले आणि लाखो किंमतीच्या क्रिप्टोकरन्सी काढून घेतल्या आहेत.
याप्रकरणी कंपनीचे म्हणणे आहे की ४,५०० कोटींहून अधिक चोरी झालेल्या क्रिप्टोकरन्सीपैकी हॅकर्सने सुमारे १,९३० कोटी क्रिप्टोकरन्सी परत केल्या आहेत. परंतु पॉलीनेटवर्कनुसार, 269 दशलक्ष इथेरियम आणि 84 दशलक्ष पॉलीगॉन परत केलेले नाहीत. कंपनीने एकामागून एक ट्विट करून ही माहिती देताना सांगितले आहे की, हॅकर्सनी काही टोकन देखील परत केले आहेत, परंतु एवढया प्रचंड चोरीनंतर हॅकर्स म्हणजेच चोरटयांनी क्रिप्टोकरन्सी का परत केली आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. आता या संदर्भात असे म्हटले जात आहे की, हॅकर्स पकडले जाण्याच्या भीतीने क्रिप्टोकरन्सी परत करत आहेत. विशेष म्हणजे क्रिप्टोकरन्सीच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असल्याचे मानले जाते. या हॅकिंगमध्ये बहुतेक करून इथेरियम क्रिप्टोकरन्सी यांचीच चोरी झालेली आहे.
— Poly Network (@PolyNetwork2) August 11, 2021