मुंबई – क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या मुनमुन धामेचा हिच्याबाबतीत एक मोठा खुलासा समोर आला आहे. मुनमुनने सॅनिटरी पॅडमध्ये ड्रग्ज लपविल्याचा एक व्हिडिओ पुढे आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या महिला अधिकाऱ्यांनी सॅनिटरी पॅडमधून ड्रग्ज काढल्याचा हा व्हिडिओ आहे. अभिनेता शाहरुख खान याचा पुत्र आर्यन खान याची मुनमुन ही मैत्रिण आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीवेळी ती उपस्थित होती. सॅनिटरी पॅडमध्ये कागदाच्या पुडीत ड्रग्ज लपविण्यात आले होते. एनसीबीनेच हा व्हिडिओ काढल्याचे बोलले जात आहे. मुनमुन ही एक मॉडेल आहे. ती एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. अनेक सेलिब्रेटींबरोबर तिची ओळख आहे. त्यामुळे अनेक पार्टींमध्ये ती सेलिब्रेटींसमवेत दिसते. बघा हा व्हिडिओ
https://twitter.com/gyanu999/status/1446789017278636032