मुंबई – अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याला आजची रात्रही तुरुंगातच काढावी लागणार आहे. क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी त्याला उच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केला. त्याला १ लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. त्याला जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावला ही न्यायालयात हजर होती. जुहीने १ लाख रुपयांची रक्कम त्यासाठी भरली आहे. आर्यनची आज तुरुंगातून सुटका होऊ शकली असती. मात्र, न्यायालयाचे आदेश हे सायंकाळी साडेपाच वाजेपूर्वी आर्थर रोड तुरुंगाबाहेरील पेटीमध्ये देणे आवश्यक होते. मात्र, वकील हे आदेश घेऊन सहा वाजेच्या सुमारास पोहचले. त्यामुळे नियमानुसार आज आर्यनची सुटका होऊ शकणार नाही. त्याला आता सूर्योदयानंतर म्हणजे सकाळीच तुरुंगाबाहेर येता येणार आहे.
https://twitter.com/ANI/status/1454062359811477513