नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. असे असले तरी देशांतर्गत बाजारपेठेमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर चढेच आहेत. ते कधी कमी होणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. गेल्या काही काळापासून अमेरिका आणि जागतिक बँकांच्या आर्थिक संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होत आहे. तसेच आजही क्रूड ऑइलच्या किंमतीतील चढउतार सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा भाव पुन्हा एकदा ८० डॉलर प्रति बॅरलच्या खाली घसरला असून लवकरच देशातील सर्वसामान्य वाहनचालकांना पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवडाभरापासून कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मात्र तरीही पेट्रोलियम कंपन्यांनी दर कपातीबाबत हात आखडता घेतला आहे. यामुळे ग्राहकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या आठ दिवसांत कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तेलाच्या किमती ७५ डॉलर्स वरून ७१ डॉलर्सवर घसरल्या आहेत. यामध्ये ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल १ डॉलर्स पेक्षा जास्त घसरून ७५.३६ वर आली आहे.
मात्र कच्चे तेल स्वस्त झाले असले तरी भारतीयांना सर्वात महाग इंधन खरेदी करण्याची वेळ आली आहे. कच्चे तेल स्वस्त झाल्याने पेट्रोल आणि डिझेलमध्ये दर कपात करताना कंपन्यांनी हात आखडता घेतला आहे. कारण आज ही कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. मात्र जाहीर झालेल्या यादीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
गेल्या एक वर्षापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल २२ मे रोजी झाला होता. त्यानुसार मुंबईत आजचा एक लिटर पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९६.६५ रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १०२.६३ रुपये आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत १०६ .३ रुपये आहे. तर मुंबईत डिझेलचा दर ९४.२७ रुपये इतका राहिला.
अमेरिकेतील इंधनाच्या मागणीमुळे सुरुवातीच्या आशियाई व्यापारात तेलाच्या किमतीत वाढ झाली. देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. किंमतींमध्ये काही बदल असल्यास पेट्रोलियमच्या वेबसाइटवर अपडेट करतात. यापूर्वी दर १५ दिवसांनी इंधनाचे दर अपडेट केल्या जायच्या, पण २०१४ मध्ये सरकारने किमती नियंत्रणमुक्त केल्या आणि २०१७ पासून इंधनाच्या किमती दररोज अपडेट होणे सुरू झाले. केंद्राने एप्रिलमध्ये नैसर्गिक वायूच्या किंमतीचे सूत्र देखील बदलले आहे.
Crude Oil Rates Reduced Petrol Diesel Rate