अजय सोनवणे/ सोमनाथ घोंगाणे
नांदगाव तालुक्यातील तांदुळवाडी येथील शेतकरी समाधान दिनकर काकळीज या शेत-याने तणनाशक औषध फवारल्यामुळे पीक पिवळी झाल्याचा आरोप केला आहे. काकळीज यांनी तीन एकर मका (BASF) या कंपनीच्या टिन्झर हे तणनाशक फवारले होते. त्यानंतर मक्याचे पीक पिवळे झाले. काकळीज यांनी नांदगाव येथील शिवधन अँग्रो या आस्थापने (BASF) या कंपनीचे टिन्झर हे तणनाशक काही दिवसांपूर्वी खरेदी केले होते. त्यांनी ते मका या पिकावर फवारले असता तीन एकर मधील मका पिवळे झाले. तर काही मका करपून गेला. यातून मोठे नुकसान होणार असून याची त्वरीत चौकशी करावी अशी मागणी काकळीज यांनी नांदगवचे कृषी अधिकारी जगदीश पाटील यांचेकडे केली आहे.