इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साधारणतः लग्न झाल्यावरच सासूरवास वाट्याला येतो, हे आपल्याला माहिती आहे. पण जगप्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या गर्लफ्रेंडला लग्नापूर्वीच सासूरवास सहन करावा लागेल, असे दिसत आहे. दोघेही आता सौदी अरेबियात राहणार असल्यामुळे त्याच्या गर्लफ्रेंडला या देशाकडूनच सासूरवास वाट्याला येणार आहे.
रोनाल्डोने सौदीतील अल नासर क्लबसोबत करार केला असून त्यासाठी तो सौदीत दाखल झाला आहे. याठिकाणी तो एकटा आलेला नसून त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्स हिच्यासोबत आला आहे. दोघांनाही एकमेकांशिवाय करमणं शक्य नव्हतं, त्यामुळे सौदीत एकत्र नांदण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पण बॅग उचलली आणि कुठल्याही देशात राहायला गेलं, असं सौदीच्या बाबतीत शक्य नाही. याठिकाणी राहण्यासाठी जॉर्जिनाला कठोर नियम पाळावे लागणार आहेत. महिलांचं स्वातंत्र्य, पाश्चिमात्य संस्कृती वगैरे या देशात चालत नाही. शिवाय जॉर्जिना आणि रोनाल्डोचं लग्न झालेलं नाही. त्यामुळे लग्नाशिवाय सासूरवास भोगण्याची वेळ सौदीत आलेली आहे.
मुळात लग्नाशिवाय एकत्र राहण्याचीच सौदीत परवानगी नाही. त्यामुळे दोघांच्या रोमँटिक स्टेपुढे तश्याही अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातल्या त्यात दोघेही सौदीचे नागरिक नसल्यामुळे त्यातून त्यांना सूट मिळाली. पण दुसऱ्या नियमातून तिला सूट मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. सौदीमध्ये प्रत्येक स्त्रीला बुरखा परिधान करणं अनिवार्य आहे. त्यामुळे शॉर्ट्स घालणाऱ्या जॉर्जिनाला बुरखा कसा दिसेल, याची कल्पना रोनाल्डोचे फॅन्स करू लागले आहेत. येथील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रोनाल्डो आणि जॉर्जिनाला काही प्रमाणात नियमांमध्ये सूट मिळू शकते, पण त्याचीही अद्याप खात्री देता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
दारू व धुम्रपानास मनाई
सौदी अरेबियामध्ये दारू पिण्यास व सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास मनाई आहे. शिवाय कोणते कपडे घालावे आणि कोणते कपडे घालू नये, याचेही काही नियम सौदी अरेबियामध्ये निश्चित आहेत. त्यामुळे जॉर्जिनाला त्याबाबतीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ती कुठल्याही धार्मिक किंवा पवित्र शहरांना भेटी देऊ शकणार नाही. तिला फक्स नैसर्गिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे. एकूणच महिलांना या देशात अनेक नियमांचे आणि बंधनांचे पालन करावे लागते. आणि त्याची आता जॉर्जिनाला सवय करून घ्यावी लागेल किंवा रोनाल्डोला विरह सहन करावा लागेल.
Cristiano Ronaldo Girl Friend Georgina Rodriguez Saudi Arabia Rules Abaya
Football Sports