इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तरुण-तरुणींमध्ये ओळखीचे आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात होणे ही गोष्ट आता नवीन राहिली नाही. किंबहुना ती एक सामान्य आणि सहज भावना समजली जाते. परंतु जेव्हा एखादी तरुणी त्या तरुणास लग्न करण्यास नकार देते किंवा काही वेळा रागाच्या भरात बदनामी किंवा गैरकृत्य करण्यास तयार होते, त्यातून एखादा गुन्हा घडू शकतो असाच काहीसा गैरप्रकार उत्तर प्रदेशात घडला.
तरुणीने लग्नास नकार दिल्यानंतर तिच्या पूर्वीच्या ओळखीच्या व्यक्तीने तिचे जगणे कठीण केले आहे. काही दिवसांपूर्वी या तरुणाने परिसरात तरुणीचा फोटो आणि मजकूर लिहिलेले पोस्टर्स लावले होते. तिच्याबद्दल अपशब्दही लिहिले. पीडितेने पोलीसात तक्रार केल्यावर पोलिसांनी आरोपीला पकडून आणले. पारा येथील या तरुणाविरुद्ध पोलिसांनी औपचारिकता पूर्ण करून त्याला सोडले. तेव्हा त्याने सुटका होताच पुन्हा तरुणीला धमकी दिली आणि तिचा विनयभंग केला. आता त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादगंज येथील पोलिस निरीक्षकाने सांगितले की, तरुणी आणि तरुण एका खासगी कंपनीत एकत्र काम करतात. आधी दोघे मित्र होते. दरम्यान, अभिषेकने लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता तरुणीने नकार दिला. यावर अभिषेकने तरुणीची बदनामी करण्यासाठी पोस्टर चिकटवले. राजाजीपुरममध्ये राहणार्या पीडित तरूणी (वय २५) नुसार, तिची छायाचित्रे असलेले पोस्टर परिसरात अनेक ठिकाणी चिकटवलेले आढळले. या पोस्टरवर तिच्याबद्दल अपशब्दही लिहिले होते. हे पोस्टर परिसरात चर्चेचा विषय बनले होते. हे पोस्टर राजनगर, पारा येथील रहिवासी अभिषेक श्रीवास्तव याने लावल्याचे काही नागरिकांडून मुलीला समजले.
मुलीचे कुटुंबीय तरुणाच्या घरी गेले असता त्यांच्यासमोर अश्लील चाळे करण्यात आले. तेव्हा पीडितेने त्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. तरुणीच्या म्हणण्यानुसार, अभिषेक तिला अनेक दिवसांपासून त्रास देत होता. पण तिने कोणालाच सांगितले नव्हते. पोस्टर लावल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला. मात्र या तक्रारीमुळे संतापलेल्या अभिषेकने तिला बोलावून शिवीगाळ केली. पीडितेने अभिषेकचा नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला होता. यावर तो तिच्या घरी आला. त्याने तिच्याशी गैरवर्तनही केले.
Uttar Pradesh crime youth paste posters girl photo defamation arrest