इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गेल्या काही दिवसांमध्ये बिहार राज्यात गुन्हेगारी मध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून हाणामारी, चोर्या, दरोडे, खून, बलात्कार यासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नुकतीच नालंदा जिल्ह्यातील एक खळबळजनक घटना घडली आहे.
हल्लेखोरांनी एका तरुणावर अॅसिड ओतून त्याला जिवंत जाळले. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यामुळे त्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले आहेत. बचावासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलीस सध्या हत्येचे कारण शोधत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना नालंदा जिल्ह्यातील हिलसा क्षेत्रातील नदाहा गावात घडली आहे. गावातील काही गुंड तरुणांनी एक युवकाला घरातून बोलावून गावाबाहेर घेऊन गेले होते. यानंतर त्याच्यावर अॅसिड ओतून त्याला जिवंत जाळण्यात आले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपीच्या घरावर दगडफेक केली.
या भयानक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांनाही ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गावकऱ्यांनी दगडफेक करून अनेक वाहनांचे नुकसान केले. दगडफेकीत अनेक पोलीस जखमी झाले. बचावासाठी पोलिसांनी देखील गोळीबार केला. आता पोलीस घटनेच्या तपासात गुंतले आहे
या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण होते. मात्र संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह उचलू दिला नाही. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे एसपींनी सांगितले. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचवेळी डॉक्टरांचे म्हणणे आहे की, प्रथमदर्शनी मृत तरूणांची अॅसिडमुळे शरीराची त्वचा जळल्याचे दिसते. त्याचा खून केल्याच्या रागातून काही गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून काही जणांना अटक करण्यात आली आहे.