इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वर्धा जिल्ह्यात एका १८ वर्षांच्या तरुणीने फिनाइल प्राशन केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर तरुणीला तिचे कुटुंबीय दवाखान्यात घेऊन गेले. पण तिला तपासल्यानंतर डॉक्टर हादरुन गेले. कारण ती गरोदर असल्याचं तपासणीत समोर आलं. या प्रकरणामुळे तिच्या कुटुंबियांनाही धक्का बसला आहे.
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास केला असता, तरुणीचं प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले आहे. हे प्रेमप्रकरण घरी समजल्यानंतर त्यांनी तिला प्रियकराला भेटण्यास बंदी घातली तरीदेखील ती प्रियकराला भेटायला गेली. याविषयी तिच्या कुटुंबियांनी जाब विचारला असता तिने फिनाइल प्राशन केले. यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला लगेचच दवाखान्यात नेलं. तिथे तिच्यावर उपचार सुरु झाले आणि तपासणीचा भाग म्हणून तिची सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी संबंधित तरुणी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
या प्रकरणातील १८ वर्षीय मुलीचे तिच्या मामीच्याच मानलेल्या भावासोबत प्रेमसंबंध जुळले होते. जानेवारी २०२२मध्ये ती आर्वी तालुक्यात असलेल्या एका गावात प्रियकराला भेटायला गेली होती. तिथे आरोपी युवकाने पीडितेशी जवळीक निर्माण करुन तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. त्यानंतरही त्यांचं नातं सुरुच राहिलं. हे तरुणीच्या भावाला समजताच त्याने बहिणीला आरोपी युवकाच्या घरुन परत आणले आणि तिला मारहाण केली. या रागाच्या भरात तिने बाथरुममध्ये जात फिनाइल प्राशन केलं. डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिच्या विविध तपासण्या केल्या. त्यात ती गर्भवती असल्याची माहिती समोर आली. हे कळताच तिच्या पालकांना मोठा धक्का बसला आहे.
crime young girl phenyl drunk hospital investigation Wardha district rape