पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पिंपरी चिंचवडच्या भोसरी पोलीस ठाण्यात पीडित २५ वर्षीय महिलेनं बलात्कार प्रकरणी तक्रार दिली आहे. आपल्या तक्रारीत या महिलेने आपल्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा आरोप एका पुरुषावर केलाय. तसंच अश्लिल फोटोंची भीती दाखवत सतत आपल्यासोबत गैरकृत्य केल्याचंही म्हटले आहे. गरोदर होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देत महिलेले बेशुद्ध करत हा प्रकार पुरुषाने केला असल्याचे महिलेने म्हणले आहे.
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित पुरुषाने आयुर्वेदिक गोळ्या देत असल्याची बतावणी केली होती. या आयुर्वेदिक गोळ्यांमुळे गरोदर होण्यासाठी मदत होत असल्याचे त्यानी म्हटलं होतं. या गोळ्यांसाठी तब्बल ९० हजार रुपये इतकी किंमतही आपण मोजल्याचं पीडितेनं म्हटलंय. दरम्यान, एक दिवस गोळ्या घेऊन तो भोसरीतील घरी आला आणि अश्लील फोटोंची भीती दाखवत वारंवार बलात्कार केला, असाही आरोप पीडितेने केला आहे.
आता हे संपूर्ण प्रकरण भोसरी पोलिसांकडे असून सबइन्स्पेक्टर गोविंद पवार यांच्याकडून पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, हा खळबळजनक आरोप महिलेने एका ५० वर्षीय पुरुषावर केला आहे. पोलिसांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. या जबाबानुसार, फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांच्या काळात आपल्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचे महिलेने म्हटले आहे.
Crime Women Rape Pregnant Aurvedic Medicines