नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृतसेवा) – कोणतेही व्यसन हे वाईटच असते. मग ते दारू असो की सिगारेटचे किंवा ड्रग्जचे व्यसनी माणसाला त्याचे व्यसन करता आले नाही तर तो अक्षरशः वेडा होतो आणि रागाच्या भरात एखाद्याचा जीवही घेऊ शकतो, असे म्हटले जाते. असाच भयानक प्रकार नवी दिल्ली शहरात घडला. एका महिलेच्या घरी आल्यानंतर ड्रग्ज न मिळाल्याने व्यसनी तरुणाने त्या महिलेशी भांडण सुरू केले. नंतर तिचे हात, पाय दोरीने बांधून गळा आवळून खून केला. मृताचा फोन तपासत असतानाच पोलिसांनी आरोपीपर्यंत पोहोचून त्याला अटक केली.
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या आरोपीवर यापूर्वीच गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तुरुंगातून तो बाहेर आला होता. आरोपीचा कसून तपास करत आहेत. आठ दिवसा पूर्वी पोलिसांना मोहन गार्डन एक्स्टेंशनमधील एका घरातून दुर्गंधी येत असल्याची तक्रार मिळाली. खोलीत एका महिलेचा मृतदेह पडलेला आहे. त्यानंतर त्या घरी येऊन पोलिसांनी पाहिले तर एका महिलेचे हात, पाय आणि तोंड बांधलेले आहे. त्याच्या मानेवर खुणा होत्या. गुन्हे आणि फॉरेन्सिक पथकाने तपास करून पुरावे गोळा केले.
प्रीती (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. मोहन गार्डन परिसरात ती गेल्या चार-पाच वर्षांपासून एकटीच राहत होती. पोलिस पथकाने आजूबाजूच्या नागरिकांची चौकशी केली आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. मात्र पोलिसांना ठोस पुरावे मिळाले नाहीत.
यानंतर पोलिसांनी प्रीतीच्या घरातून मोबाईलचा सीडीआर काढून तपास केला. तपासात महिलेचा फोन सुरू असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून उत्तम नगर येथील दिनेश शर्मा याला अटक केली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्याला ड्रग्जचे व्यसन असून यापूर्वी अनेक गुन्हे केल्याचे त्याने सांगितले.
आरोपीने सांगितले की, तो स्कूटीवरुन मित्राच्या घरी जात होता. एका महिलेने त्याला थांबवले आणि घरी सोडण्याची (लिफ्ट दे्याची) विनंती केली. आरोपीने महिलेला सोडण्याच्या बदल्यात अंमली पदार्थ देण्याचे सांगितले. महिलेला त्याने घरी सोडले आणि अंमली पदार्थ मागिरतेल. मात्र, ते न दिल्याने त्याने तिचा खुन केला.