कानपूर (उत्तर प्रदेश) – हुंडा पद्धत रद्द करून 1961 भारतात हुंडा विरोधी कायदा लागू करण्यात आला. मात्र त्यानंतरही या ना त्या स्वरूपात आजही वधूकडून हुंडा घेण्याची प्रथा काही लोक इमाने इतबारे पाळतात. अगदी मोजक्या समजदार लोकांनी या प्रथेला फाटा दिला आहे. आजही हुंडा न मिळाल्याने, सुनेने किंवा पत्नीने माहेरून पैसे, वस्तू न आणल्याने संबंधित महिलेचा जीव घेण्यापर्यंत सासरचे छळ करतात. मात्र कानपूरजवळच्या या पतीने आणि सासरच्या मंडळींनी त्याही पलिकडचा प्रकार केला आहे. त्यातून पती-पत्नीच्या नात्यासह माणुसकी आणि स्त्रियांच्या आत्मसन्मानावरच घाला घालण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. सांगण्याची बाब म्हणजे आम्ही हुंडा घेणार नाही असे सांगून सासरच्यांनी विवाह जुळवताना सांगितले होते.
ग्वालटोळी परिसरतील ही घटना आहे. दोन वर्षांपूर्वी येथील एका ज्वेलर्सने आपल्या मुलाचे लग्न ठरविले. लग्न ठरवताना आम्हाला हुंडा नको अशी बतावणी केली. लग्न जमल्यानंतर मात्र आठवडाभरातच त्याने हुंड्यापोटी थोडी थिडकी नाही , तर एक कोटी रुपयांची मागणी केली. या मागणीने वधूपित्याला धडकीच भरली. मात्र मुलीचे लग्न न मोडण्यासाठी म्हणून त्याने 25 लाख रोख आणि 20 लाखांचे दागिणे सासरच्या मंडळींना दिलेत.
इतके पैसे मिळूनही लालची सासरच्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी सुनेला त्रास देण्यास सुरूवात केली. त्यातच लग्नानंतर मुलीला असेही समजले की आपल्या पतीला ड्रग्जची नशा करतो. अगदी पहिल्या रात्रीपासूनच त्याने तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यास सुरूवात करून अन्य प्रकारे छळ करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान सासरच्या मंडळींची हुंडा मागणी सुरूच होती आणि सुनेचा छळही. मात्र पैसे मिळत नसल्याने त्यांनी भलताच मार्ग शोधून काढला. सुनेच्या बेडरूम, बाथरूम वगैरे सर्व वावराच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आणि सुनेचे चित्रीकरण केले. त्यातून संबंधित महिला आणि तिच्या पतीचे खासगी प्रसंगही चित्रीत झाले. नंतर आपल्या सुनेचे हे सर्व अश्लील पद्धतीचे व्हिडिओ पती आणि सासरच्या मंडळींनी नातलग आणि मित्रपरिवारात व्हायरल केले. दरम्यान एकदा तिचा गर्भपातही केला.
इतके होऊनही त्यांचा छळ काही थांबला नाही. त्यांनी नंतर चक्क सुनेला कोंडून ठेवले आणि तिचे चित्रिकरण करत राहिले. पतीही अत्याचार करत राहिला, अनैसर्गिक कृत्य करत राहिला. यातून पीडितेने कसाबसा पोलिसांशी संपर्क केल्यावर तिची सुटका करण्यात आली. त्यातूनच सासरच्या मंडळींच्या या काळ्या करतुदी समोर समोर आल्या. पोलिसांनी आता सासू, सासरे, पती, नणंद यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याभोवती कायद्याचा फास आवळण्याचे काम सुरू केले आहे. हुंडा मागणाºया कुटुंबाला नकार देण्याऐवजी त्यांची मागणी पुरविली आणि त्यांच्या लालसेला खतपाणी घातले या बद्दल आता मुलीच्या घरच्यांनाही पश्चाताप होत आहे.