इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बिहारमधील एका महिला डॉक्टरवर तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये तीन जणांनी सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण तेथील विधानसभेतही गाजले. यानंतर मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी घटनेच्या दिवशी तिच्या मैत्रासोबत चित्रपट पाहून घरी परतत होती. मध्यरात्री चित्रपट संपल्यानंतर दोघेही चित्रपटगृहासमोर ऑटोसाठी उभे राहिले. तेवढ्यात ऑटो चालक आला. ऑटोमध्ये आधी एक चालक आणि चार जण होते. डॉक्टरने ड्रायव्हरला हॉस्पिटलच्या दिशेने चालायला सांगितले. काही अंतर गेल्यावर रिक्षा चालकाने रस्ता बदलून वेग वाढवला. महिलेने चालकाला मार्ग का बदलला असे विचारले असता, चालकाने सांगितले की, रात्री रस्ता बंद होतो.
यानंतर वाटेत स्मशानभूमीजवळ एका निर्जन ठिकाणी ऑटो थांबवण्यात आला. यानंतर चार मुलांनी आणि ऑटोचालकाने तरुणी आणि तिच्या मित्राला मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. यानंतर
या महिला डॉक्टराने वेल्लोरचे पोलिस अधीक्षक राजेश कन्नन यांच्याकडे ऑनलाइन तक्रार दाखल केली, त्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला.