इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आजच्या काळात जगामध्ये जसे चांगले चांगले नागरिक आहेत, तसेच काही जण वाईट देखील आहेत, त्यामुळेच अत्यंत वाईट आणि घृणास्पद घटना घडत असतात. त्याच्या नात्यातील व्यक्तीलाही ही माणसे सोडत नाहीत, अगदी पत्नीलाही वाईट कृत्य करण्यास भाग पाडतात. असाच प्रकार उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये घडला.
पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारा वाईफ स्वॅपिंगचा प्रकार समोर आला आहे. पतीने पत्नीला फसवून दिल्लीच्या वाईफ स्वॅपिंग म्हणजेच एक्स्चेंज पार्टीमध्ये नेले, तिथे तिच्यासोबत खूप वाईट प्रकार घडला. यावर पीडितेने पोलिसांकडे धाव घेत न्याय देण्याची मागणी केली, मात्र तिला दिलासा न मिळाल्याने अखेर कोर्टाने निर्देश दिल्याने पती आणि दीराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पीडित महिलेचे लग्न गुरुग्रामच्या सौरभ डुडेजासोबत जानेवारी २०२१ मध्ये झाले होते. सुरुवातीला सारे ठीक सुरु होते. एके दिवशी पतीने शॉपिंग करायला जाऊ या म्हणत तिला दिल्लीला नेले. तिथे तो तिला वाईफ एक्स्चेंज पार्टीत घेऊन गेला. तिथे तिची अब्रू लुटली गेली. यानंतर पुन्हा तिने पतीला असल्या पार्ट्यांना घेऊन जाण्यास नकार दिला. यावर त्याने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.
महिलेच्या आरोपानुसार तिचा दीर शुभम डुडेजा यानेही तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आहे. पतीकडे तक्रार केली तर त्याने याकडे दुर्लक्ष केले. शुभम अविवाहित आहे, त्याला खूश करत रहा, असे पतीने तिला सांगितले होते. विरोध केल्यावर तिला मारहाणही करण्यात आली. यानंतर पतीने त्याला गुरुग्राममध्ये वेगळ्या भाड्याच्या खोलीत ठेवले होते.
अत्यंत वाईट प्रकार म्हणजे दीराने एकदा तिच्यावर बलात्काराचा व्हिडीओ देखील बनविला आहे. पोलिसांकडे तक्रार केली तर सोशल मीडियावर तो व्हायरल करण्याची धमकी दिली होती. तिने या प्रकाराला वैतागून मुजफ्फरनगर एसएसपी आणि पोलीस ठाण्यात तक्रार केली होती, मात्र काहीच कारवाई झाली नाही, असे तिचे म्हणणे होते. यावर कोर्टाने पती आणि दीरावर गुन्हा नोंद करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. आता या महिलेला खरच न्याय मिळणार का याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.
Crime Wife exchange party husband Uttar Pradesh Muzzafarpur