इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – गुजरातमधील सुरत शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका विवाहित व्यक्तीने आधी प्रेयसीवर बलात्कार केला, त्यानंतर तिच्या खासगी भागामध्ये लाल मिरची टाकली. या घटनेनंतर मुलीची प्रकृती खालावल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विवाहित तरुणाने गावात राहणाऱ्या एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. काही दिवसांनी प्रेयसीला समजले की तिचा प्रियकर निकुंज पटेल आधीच विवाहित आहे. त्यामुळे तिने प्रियकरापासून दूर राहण्यास सुरुवात केली. महिलेच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या पटेलने तिला केबल वायरने बेदम मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला.
अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे त्याने प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूडही टाकली. यानंतर आरोपीने तिचे खासगी फोटो सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली. गंभीर दुखापतीमुळे पीडितेला रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Crime Surat Girl Friend Rape Beaten