इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – परीक्षेत नापास झाल्याच्या कारणाने विद्यार्थ्यांनी शिक्षकांना चक्क झाडाला बांधल्याची घटना झारखंडमध्ये घडली आहे. नापास होण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली नाहीच शिवाय शिक्षकांनाच नापास होण्यास कारणीभूत ठरवले.
नापास झाल्यानंतर ९९.९९ टक्के लोकं स्वतःलाच दोष देतात. ०.१ टक्के लोकं देवालाही दोष देऊ शकतात. पण नापास झालो म्हणून शिक्षकांना फारसं कोणी दोष देत नाही. झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी मात्र शिक्षकांनाच दोषी ठरवलं आहे. इतकंच नाही तर त्यांना या कारणाने चक्क झाडाला बांधून ठेवलं. त्यानंतर त्यांना शिक्षा म्हणून मारहाणही केली. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियातली वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
झारखंडमध्ये नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हा प्रकार शिक्षकांसोबत केला आहे. या मारहाणीचं कारण जेव्हा समोर आलं, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. ANI वृत्त संस्थेनं याबाबतचे वृत्त दिलं आहे. झारखंडमधील दुमका जिल्ह्यातील ही घटना सध्या सोशल मीडियात चर्चेत आलीय. एकूण ३६ विद्यार्थी नववीच्या प्रॅक्टीकल परीक्षेला बसले होते. त्यापैकी ११ विद्यार्थी नापास झाले.
गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकासह शाळेतील दोघा कर्मचाऱ्यांना विद्यार्थ्यांनी पकडलं आणि झाडालं बांधलं. यानंतर मारहाण केली गेली. यात शिक्षक कुमार सुमन जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये काही विद्यार्थी या शिक्षकांशी बाचाबाची करत आहेत. दोघा विद्यार्थ्यांच्या हातात एक काठीही दिसत असून, ते विद्यार्थी हातात काठी घेऊन झाडाला गोल गोल फेऱ्या मारत असल्याचं दिसतंय. तर गणवेशातील इतर विद्यार्थी या ठिकाणी गोळा झालेत. यातील काही विद्यार्थी सदर घटनेचा व्हीडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहे.
https://twitter.com/ANI/status/1564879467264495616?s=20&t=ByS4Fq3aZliQb-DainQOmQ
Crime Student beaten Teachers Exam